शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

रोह्यात शेतजमिनीचा गैरव्यवहार, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 06:29 IST

मुंबई व पुणे येथील सात जणांनी संगनमत करून, मूळ जमीन मालकाऐवजी तोतया जमीन मालकाला उभे करून लाखो रुपये किमतीच्या शेतजमिनीचा गैरव्यवहार करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रोह्यात घडला आहे.

रोहा : मुंबई व पुणे येथील सात जणांनी संगनमत करून, मूळ जमीन मालकाऐवजी तोतया जमीन मालकाला उभे करून लाखो रुपये किमतीच्या शेतजमिनीचा गैरव्यवहार करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रोह्यात घडला आहे. बनवाबनवी करणाºया सात जणांविरोधात पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट सरकारी कागदपत्रे तयार करणे व त्यांचा गैरवापर करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.रोहा-चणेरा मार्गावरील शेडसई येथे हर्षद किशोरचंद मोदी (रा.विलेपार्ले, मुंबई) यांच्या मालकीची जमीन व फार्महाऊस आहे. सुटीनिमित्त मोदी परिवार व त्यांचे मित्रमंडळ या ठिकाणी येत असत. असे असताना मागील दीड ते दोन वर्षांपासून ते या ठिकाणी येत नाहीत या संधीचा गैरफायदा घेत पुणे व मुंबईतील सात जणांनी संगनमत करून जमीनमालक हर्षद मोदी यांचे नाव वापरून मुखत्यारपत्र लिहून देणाºया एका अनोळखी तोतया व्यक्तीशी संगनमत करून जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करून परस्पर विक्र ी केली व मूळ जमीन व फार्महाऊस मालकांची फसवणूक केली. असे असताना काही दिवसांपूर्वी हर्षद मोदी आपल्या पत्नी समवेत रोह्यातील तलाठी कार्यालयात धारा भरण्यासाठी व नूतन सातबारा मिळावे याकरिता आले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे दोन लाख रु. किमतीची आपल्या मालकीची जमीन व फार्महाऊस परस्पर विकल्याचे समजताच मोदी दाम्पत्याच्या पायाखालची वाळूच सरकली.हा प्रकार १५ आॅक्टोबर रोजी घडला असून पोलिसांनी रवींद्र यशवंत मेहेंदळे (रा. लोकमान्य पुणे), मीना जोशी (रा.सासवड, पुणे), अजय शांताराम धीवार (रा. पुरंदर, पुणे), सुप्रिया शंकर गद्रे (रा. बांद्रा, मुंबई), समिक्षा रवींद्र मेहेंदळे (रा. निर्मलबाग, पुणे), मुस्तफा काझी (रा. कोंढवी-मुंबई) व अन्य एक अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पो.नि.विकास रामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रशांत तायडे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Raigadरायगड