शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उरणमधील ३५ गावांतील रस्ते बनले डम्पिंग ग्राउंड..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 11:33 IST

उरण तालुक्यातील ३५ पैकी एकाही ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची सुविधा नाही.

उरण : स्वच्छ भारत अभियानाचे उरणच्या ग्रामपंचायतींनी तीनतेरा वाजवले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून परिसरातील रस्त्यांचे डम्पिंग ग्राउंड केल्याचे चित्र उरण तालुक्यात दिसून येत आहे. अशा जागोजागी साठलेल्या कचऱ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.उरण तालुक्यातील ३५ पैकी एकाही ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची सुविधा नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या हद्दीतील दररोज जमा होणारा सुमारे १०० टन कचरा मिळेल त्या जागी, दिसेल तिथे ठिकठिकाणी रहदारीच्या रस्त्यांच्या दुतर्फा जागेवर टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांना नाक दाबून प्रवास करावा लागत असल्याची माहिती अनंत नारंगीकर यांनी दिली.सध्या मोठ्या प्रमाणात केरकचरा हा चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड तसेच तालुक्यातील इतर रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या दुर्गंधीने साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, एकीकडे शासन स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करीत असताना ग्रामपंचायती मात्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत. ग्रामस्वच्छतेसाठी शासन आग्रही आहे. विविध योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चही केले जातात. मात्र, त्यानंतरही उरण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालेला दिसतो आहे.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या कायममागील अनेक वर्षांपासूनच चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिडको, जिल्हाधिकाऱ्यांकडे डंपिंग ग्राऊंडची मागणी करण्यात आली आहे. मात्र मागणी अद्यापही पुर्ण झाली नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या कायम सतावत असल्याची प्रतिक्रिया चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अमित भगत यांनी दिली.

उपाययोजना करणारसध्याच्या घडीला ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची कोणतीही सोय नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. सिडको, जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेसाठी मागणी केल्याची माहिती खोपटा-बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर यांनी दिली.उरण तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतींकडे डम्पिंग ग्राउंड नाही. डम्पिंग ग्राउंडसाठी उरण तहसीलदार, सिडको तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड