शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

खड्ड्यांमुळे मुरुड तालुक्यातील रस्त्यांची चाळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 01:10 IST

वाहनचालकांची कसरत : दुरुस्ती कधी होणार? नागरिकांचा प्रश्न; मुरुड ते साळाव ३२ किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था

मुरुड : तालुक्यातील खड्डे पावसाळा संपला तरी बुजविले जात नसल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मुरुड तालुक्यातील रस्त्यामधील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग कधी बुजविणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. मुरुड ते साळाव हा ३२ किलोमीटरचा रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला असून दुचाकी व विक्रम व चारचाकी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विहूर येथील मामीन पेट्रोल पंप सोडल्यानंतर या रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांमुळे मोठा त्रास व जिथे जाऊ तिथे खड्डे अशी परस्थिती पहावयास मिळत आहे. सन २०१९ चा पाऊस मुरुड तालुक्यात सर्वाधिक पडल्याने रस्त्याची अवस्था खड्डेच खड्डे अशी पहावयास मिळत आहे.

साळाव ते मुरुड हा रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात येते; परंतु हा रस्ता प्रत्यक्षात सुरु न झाल्याने लोकांना खड्डयांमधून प्रवास करावा लागत आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला सदरचे खड्डे भरण्याचा विसर पडला आहे. मुरुड साळाव याच रस्त्यावरून मुंबई हा मुख्य मार्ग जात असताना सुद्धा रस्त्यावरील खड्डे मात्र भरले जात नसल्याने सामान्य नागरिकांसह आॅटो रिक्षा चालक, विक्रम व चारचाकी चालक नाराजी व्यक्त करीत आहेत.सध्या अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे पाऊस अधून मधून पडत आहे. त्याचप्रमाणे चक्रीवादळ व मुसळधार पाऊस कोसळल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे आम्ही हे काम सुरु केलेले नाही. अशा परिस्थिीतीमध्ये काम सुरु केल्यास सर्व खर्च वाया जाऊ शकतो. खड्डे भरण्यासाठी आम्ही पूर्व तयारी केली आहे. ८ नोव्हेंबरनंतर वातावरण निवळेल, पाऊस कमी होईल त्यानंतर त्वरित कामाला सुरुवात करणार आहोत.- एस.जगे, प्रभारी, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरूडरोहा-कोलाड मार्गावर जीवघेणे खड्डे१रोहा : रोह्यातील रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी वारंवार मागणी, अधिकाऱ्यांच्या भेटी, पाठपुरावा करण्यात आला. मात्र रस्त्यांची परिस्थिती आणखी गंभीर बनली, सर्वाधिक वर्दळीच्या रोहा -कोलाड मार्ग उध्वस्त झाला असून या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने भरण्यात यावेत अन्यथा आंदोलन करण्याचा अल्टिमेटम वजा इशारा रोहा सिटिझन फोरमतर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे.२रोहा -कोलाड राज्यमार्गाची पावसाळ्याच्या सुरवाती पासूनच दुरावस्था झालेली आहे. मुंबई -गोवा महामार्गावरील रोहा शहर व परिसराला जोडणारा हा मार्ग असल्यामुळे येथे सर्व प्रकारच्या वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. धाटाव औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये जाणारे अधिकारी, कामगार, विविध शाळांमधील विद्यार्थी यांची वाहने अशी सतत वाहतूक या मार्गावरून होत असते. मात्र मागील कित्येक वर्षे हा रस्ता नादुरुस्त अवस्थेतच राहिलेला आहे.३या वर्षीच्या पावसाळ्याच्या सुरवाती पासूनच या मार्गाची पूर्ण वाताहात झाली आहे. दोन- दोन फुटांच्या खड्ड्यांमधून व पावसाळ्यात चिखल आणि ऊन पडल्यावर धुळीचा सामना करत या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रोहा- कोलाड यामुख्य रहदारीच्या रसत्याच्या दुरावस्थेमुळे वाहनचालकांसह सर्व नागरिक पुरते हैराण झालेले आहेत. दिवसेंदिवस या मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.४रोहा सिटिझन फोरमने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग रोहाच्या अधिक ाऱ्यांकडे याबाबत सनदशीर मार्गाने चर्चा करत हे खड्डे बुजवण्याची मागणी करत आली आहे. मात्र प्रत्येक वेळी आश्वासना पलीकडे कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यामुळे आता येत्या सात दिवसांचे आत या मार्गावरील सर्व खड्डे बुजवा अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रोहा कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्याचा अल्टिमेटम वजा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. यासंबधीचे निवेदन रोहा तहसीलदार कविता जाधव यांना देण्यात आले. यावेळी सिटिझन फोरमचे निमंत्रक प्रदीप देशमुख, राजेंद्र जाधव, शशिकांत मोरे, सुहास येरुणकर, रविंद्र कान्हेकर, हाजी कोठारी, मिलिंद पाटणकर आदी उपस्थित होते.दुरुस्ती अन्यथा आंदोलन रोहा सिटिझन फोरमचा प्रशासनाला अल्टिमेटमसिटीझंस फोरमने दिलेल्या निवेदनावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे तसेच रोहा कोलाड रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्यात यावेत यासाठी आवश्यक सूचना बांधकाम विभागाला देण्यात येतील.- कविता जाधव, तहसिलदार रोहा.पुढील सात दिवसांत दुरुस्तीचे काम सुरु न झाल्यास आता नुसत्या चर्चा न करता रोहा सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर सिटीझंस फोरमच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रोहा तहसिलदारांना निवेदनात दिला आहे.- प्रदीप देशमुख, निमंत्रक,रोहा तालुका सिटिझंस फोरम

टॅग्स :Raigadरायगड