शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 04:09 IST

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली.

अलिबाग - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड शहर आणि परिसरात सावित्री नदीचे पाणी घुसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी महाड येथे ४८ मि.मी. तर पोलादपूर येथे ८५मि.मी. तर महाबळेश्वर येथे झालेल्या २०१ मि.मी. पावसाने सावित्री नदीला पूर आला.दरम्यान, येत्या २४ तासांत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शनिवारी सायंकाळनंतर भरती असल्याने तोपर्यंत पुराचे पाणी न ओसरल्यास महाडमधील परिस्थिती चिंताजनक होऊ शकत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि आपत्ती निवारण यंत्रणा जिल्ह्यात हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. संभाव्य भूस्खलनग्रस्त गावांत गरज भासल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील, तसेच दरडग्रस्त व नदी किनाऱ्यावरील गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने जिल्ह्यात सर्व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याचे कळविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबणे, माती खचणे आदी घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत बचाव पथक, बचाव साहित्य, रु ग्णवाहिका, रुग्णालये आदी सुविधा तत्पर व सतर्क ठेवा. जुन्या व धोकादायक पुलांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे. पुलांवरून पाणी वाहत असल्यास रहदारी पूर्णपणे थांबवावी. सखल भागातून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नैसर्गिक प्रवाहातील अडथळे दूर करावे, वादळामुळे झाड पडल्यास रहदारी सुरळीत होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात आदी सूचना नियंत्रण कक्षाला दिल्या आहेत.जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री नद्यांच्या खोºयात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरRaigadरायगड