शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बदलत्या वातावरणाचा आंबा उत्पादनाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:26 IST

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे.

सिकंदर अनवारेदासगाव : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील सातत्याने होत असलेल्या बदलामुळे आंबा उत्पादन धोक्यात आले आहे. या बदलामुळे आलेल्या मोहोरावर कीड निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नियमित औषधांची फवारणी करावी, असे आवाहन महाड कृषी उप विभागीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी केले आहे.महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या चारही तालुक्यांतील हवामान आंब्याला पोषक आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यांमध्ये ९ हजार ७७५ हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याचे उत्पन्न घेण्यात येते. महाड तालुक्यात ७२५ हेक्टर, पोलादपूरमध्ये १५१.३५ हेक्टर, म्हसळामध्ये १,८७९ हेक्टर तर श्रीवर्धनमध्ये चार हजार ६६५.३५ हेक्टर क्षेत्रांमध्ये आंब्याचे उत्पादन घेतले जाते. या क्षेत्रात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. या सध्याच्या बदलामुळे शेतकऱ्यांनी सावध राहाण्याची आवश्यकता आहे. ज्या वेळी मोहोर दिसू लागतो, त्या वेळी पहिली फवारणी पोपटी रंगाच्या पालवीवर करावी. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाºया तुडतुड्यांपासून संरक्षण होते. तुडतुड्यामुळे पानावर चिकटा पडल्याने झाडाला मुंग्या येण्याची शक्यता असते. या फवारणीमुळे मुंग्यांपासूनही संरक्षण होते असे कृषी पर्यवेक्षक रमेश वाघमारे आणि कृषी सहायक किरण कोकरे यांनी सांगितले.>‘भुरी’चा प्रादुर्भावगेल्या काही दिवसांपासून हवामानातील सतत होणाºया बदलामुळे आंब्यावरील मोहरावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागत असला, तरी महाड पोलादपूर तालुक्यामध्ये याचे प्रमाण अत्यल्प असल्याने वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. महाड, पोलादपूर तालुक्यांतील शेतकºयांनी आंबा पिकाप्रमाणे शेती विषयक अन्य काही अडचणी असल्यास कृषी पर्यवेक्षक रमेश वाघमारे, कृषी सहायक किरण कोकरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रफल्ल बनसोडे यांनी केले आहे.