शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये घोडेस्वारी करताय, हेल्मेट घातले ना? अपघात वाढले, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 11:47 IST

Matheran : माथेरानमध्ये २५ जानेवारी रोजी एका पर्यटकाचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. यात त्या पर्यटकाने हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारच्या दुर्घटना माथेरानमध्ये दरवर्षी घडतात. 

- संजय गायकवाडकर्जत : माथेरानमध्ये २५ जानेवारी रोजी एका पर्यटकाचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. यात त्या पर्यटकाने हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारच्या दुर्घटना माथेरानमध्ये दरवर्षी घडतात. पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने माथेरानमध्ये घोडेस्वारी करीत असाल तर हेल्मेट असेल तरच सवारी करा, असे आवाहन आता नगरपालिका प्रशासनानेही केले आहे. 

दरम्यान, या समस्येबाबत पाेलिसांबरोबर लवकरच एक बैठक घेणार असल्याचेही नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  माथेरानमध्ये २५ जानेवारी रोजी आपल्या पत्नीसह फिरायला आलेल्या मोहम्मद काशीद इम्तियाज शेख  (वय २३) या तरुणाचा घोड्यावरून पडून अपघात झाला. उपचारादरम्यान त्याचा  मृत्यू झाला. हेल्मेट नसल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली  आहे. 

दोन वर्षांपूर्वी समीर बांदेकर यांनी घोडेस्वारी सुरक्षिततेसाठी मोफत हेल्मेट वाटप केले होते. मात्र, काही दिवसांतच हेल्मेट वापरणे बंद झाले. एवढे मृत्यू होऊनदेखील  पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचे घोडा हे प्रमुख आकर्षण आहे. येथे येणारा पर्यटक घोड्यावरून फिरायला जात नाही असे होत नाही. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची आहे.

पोलिसांसोबत बैठक घेऊन सरकारने ठरवून दिलेल्या अटींनुसार घोडेचालक यांना नियमावलीची सक्ती करणार आहे. नगर परिषद याबाबत सकारात्मक आहे, शेवटी पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे.- सुरेखा भणगे, मुख्याधिकारी, माथेरान नगर परिषद.

सुरक्षेसाठी काय करावे?घोड्यावर बसणाऱ्या पर्यटकांना हेल्मेट सक्तीचे करावे. घोड्याची देखभाल करणारा कामगार प्रशिक्षित आहे किंवा नाही याची पोलिसांनी तपासणी करावी.

यापूर्वीच्या दुर्घटना १९९७  एका विदेशी पर्यटकाचा घोडा उधळल्याने लुईझा पाॅइंटवरून दरीत पडून घोड्यासह मृत्यू. २०१५   इंडिया मेहयू ही परदेशी पर्यटक घोड्याच्या पायाखालील येऊन मृत्युमुखी.  २०१६  निलीम सिंग हिचा एको पाॅइंटदरम्यान घोड्यावरून पडून मृत्यू. २०१८  ग्रँट रोड येथील रहिवासी रशिदा रेडिओवाला हिला गंभीर दुखापत, तर भिवंडीतील रहिवासी अश्रफ खानदेखील दस्तुरी नाक्यावर पडून दुखापत.

टॅग्स :Matheranमाथेरानtourismपर्यटन