शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये 6300 हेक्टरवर होणार भातशेती, शेतकऱ्यांची पेरणीसाठी नांगरणीला सुरुवात 

By वैभव गायकर | Updated: June 11, 2024 15:58 IST

मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली.

पनवेल: पेरणी योग्य पाऊस झाल्याने पनवेल मधील शेतकरी आपल्या शेतात नागरंणी करीत असून धान पेरणीच्या कामाला लागला आहे. यावर्षी कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात 6300 हेक्टरवर भातशेती केली जाणार आहे.

पनवेल तालुक्याचा झपाट्याने विकास होत आहे.तालुक्यात आंतराष्ट्रीय विमानतळ आल्याने जमिनींना सोन्याचे भाव प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दरवर्षी झपाट्याने कमी होत आहे. मात्र असे असले तरी बहुतांशी शेतकरी आपला परंपरागत शेती व्यवसाय करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत तसेच खत टाकणे, पार, धुरे दुरुस्त करणे, शेतीची सफाई करणे इत्यादी कामे जवळपास संपविली होती. मृग लागला की पऱ्हे टाकायचे या तयारीत शेतकरी होते. परंतु शेतकऱ्यांना पऱ्हे टाकण्यासाठी जमिनीची नागरणी करणे आवश्यक असते. अशात प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत होता.

मृगाच्या सुरुवातीला एकदा तरी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा करीत होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने मृग नक्षत्र लागताच हजेरी लावली. दमदार पाऊस झाल्याने सगळ्या शेतकऱ्यांची कामे सुरु झाली. प्रत्येक शेतकरी धान खरेदी करुन किंवा मागील वर्षीचे ठेवलेले बियाणे वापरुन पेरणी करीत आहेत. पनवेल तालुक्यात मॉन्सूनचे आगमन सामान्यत: 7 ते 10 जून पर्यंत होत असते. त्यानुसार पावसाने हजेरी लावली आहे. अशात मशागत करुन ठेवलेल्या शेतात पेरणीला सुरुवात केली तर ते व्यवस्थित उगवतात, असा समज असून अनेकांचे प्रयोग यशस्वी होतात. परंतु यंदा लगेच पावसाने हजेरी लावल्याने आणि सगळ्यांना पेरणीची संधी लाभली.

समाधानकारक पावसाची अपेक्षायंदा हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास केला तर मान्सून चांगला येणार असून पिकासाठी समाधानकारक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. आजचा शेतकरी काही प्रमाणात आपल्या पारंपरिकरित्या पावसाचा अंदाज लावतात. परंतु आता जास्तीत जास्त शेतकरी हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवू लागला आहे. अनेकवेळा हवामान खात्याचे भाकित सुद्धा फोल ठरते.

6300 हेक्टरवर पेरणी होणार आहे.पेरणीसाठी शेतकऱ्यांची  लगबग सुरु आहे.पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरक एवढा पाऊस झाला आहे, असे पनवेल तालुका कृषी अधिकारी तानाजी दौलतोडे म्हणाले.

टॅग्स :panvelपनवेलFarmerशेतकरी