शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'पाच दिवसांचा आठवडा तरी महसूल विभाग ३६५ दिवस व्यस्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 23:13 IST

बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन; कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा नोगोठणेत शुभारंभ

नागोठणे : आज येथे कोतवालांपासून आयुक्तांपर्यंतचे अधिकारी एकत्र आले आहेत. प्रोटोकॉल विसरून सर्व खेळाडूंनी खेळत राहावे, असा सल्ला देताना थोरात यांनी शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला असला, तरी महसूल विभागाच्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना ३६५ दिवस काम करावे लागत असल्याने स्पर्धेचे दोन-तीन दिवस आनंदाचे आहेत हे समजून मार्गक्रमण करावे, असे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला शुक्रवारपासून येथील रिलायन्सच्या अंबानी फाउंडेशन शाळेच्या मैदानावर प्रारंभ झाला. स्पर्धा तीन दिवस चालणार असून, उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या स्पर्धेच्या निमित्ताने महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाºयांपर्यंत सर्वच जण एकत्र आले असल्याने सर्वांनीच या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन थोरात यांनी केले.कोकणातील सातही जिल्ह्यांची सातही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. मात्र, या स्पर्धेला या सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंनी भरभरून प्रतिसाद दिला असल्यामुळे ही स्पर्धा चुरशीचीच होईल, असा विश्वास कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी व्यक्त केला. २०११ साली नागोठण्यात ही स्पर्धा झाली होती व त्यानंतर या वर्षी पुन्हा रायगडला ही संधी मिळाली आहे. स्पर्धेत सात जिल्ह्यांचे १५०० खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले. या वेळी खा. सुनील तटकरे, माजी आ. माणिकराव जगताप, मधुकर पाटील, जि. प. उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.माणगाव येथे या क्रीडा संकुलासाठी५० कोटींचा निधी-आदिती तटकरेरायगड जिल्ह्यात क्रीडा संकुलची मागणी होती व त्याला आता मूर्त स्वरूप येण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. माणगाव येथे हे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून, त्यासाठी शासनाकडून लवकरच ५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे व पाच वर्षांनी ही स्पर्धा माणगावला घेण्यात येईल, असा विश्वास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात