शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

निवृत्त शिक्षक, निवृत्त कर्मचाऱ्यांची सरकारी दप्तरी ‘मजूर’ म्हणून नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 6:50 AM

- जिल्ह्यातील बहुतांश मजूर सहकारी संस्थांमध्ये निवृत्त शिक्षक, निवृत्त कर्मचारी त्याचप्रमाणे मालमत्ता बाळगणारे हे सरकारी दप्तरी ‘मजूर’ म्हणून नोंदवले गेले आहेत. सरकारच्या डोळ्यात धूळफेक करून दोन्ही बाजूंनी लाभ लाटणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

अलिबाग  - जिल्ह्यातील बहुतांश मजूर सहकारी संस्थांमध्ये निवृत्त शिक्षक, निवृत्त कर्मचारी त्याचप्रमाणे मालमत्ता बाळगणारे हे सरकारी दप्तरी ‘मजूर’ म्हणून नोंदवले गेले आहेत. सरकारच्या डोळ्यात धूळफेक करून दोन्ही बाजूंनी लाभ लाटणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांना माहितीच्या अधिकारामध्ये सदरची बाब उघड झाल्याने सहकार चळवळही पोखरली जात असल्याचे अधोरेखित होत आहे. मजूर सहकारी संस्थांसाठीचा सभासद हा मजूर वर्गातील म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीने व शारीरिक श्रमाची कामे करणारी व्यक्ती असली पाहिजे. त्या व्यक्तीच्या उपजीविकेचे प्रमुख साधन हे मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. ती व्यक्ती शारीरिक श्रमातून मजुरी करणारी असली पाहिजे अशा अटी आहेत. परंतु रायगड जिल्ह्यामधील बहुतांशी नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसते.सरकारी निवृत्ती वेतन घेणारे निवृत्त कर्मचारी, निवृत्त शिक्षक व करोडोंची मालमत्ता असणारे व्यक्ती मजूर म्हणून नोंदविले गेल्याचे समोर आले आहे. अनंत गोटीराम देशमुख हे सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्ती वेतन सुरू असल्याने त्यांच्या उपजीविकेचे साधन फक्त मजुरी नाही हे स्पष्ट होते. तरीही ते प्रबळगड मजूर सहकारी संस्था मर्यादित, हातनोली ता.खालापूर या मजूर संस्थेमध्ये ७३ व्या वर्षी देखील सभासद असल्याचे दिसून येते. त्यांची मजूर सदस्य क्र .१२८ अशी नोंद असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाने ठाकूर यांना दिलेल्या १६ फेब्रुवारी २०१८ च्या पत्रामध्ये नमूद केले आहे. मजुरांसाठीची विहित वयोमर्यादा ७० वर्षे असताना अनंतराव देशमुख, शंकर दादू म्हात्रे या मजुरांचे वय हे अनुक्र मे ७३ व ७५ असल्याचे दिसून येते.शंकर दादू म्हात्रे, अनिल शांताराम पाटील, अनिल गोमा पाटील यांचे पुत्र अभिषेक अनिल पाटील, द्वारकानाथ नाईक यांचे पुत्र मृणाल नाईक, नाईक यांच्या सूनबाई ईशा मृणाल नाईक, मनोज हरिचंद्र भगत, नाझनिन अस्लम राऊत, आशा रामदास मालपाणी, निनाद विकास पाटील त्याचप्रमाणे साईधाम मजूर सहकारी संस्था मर्या. श्रीबाग, ता.अलिबागमधील मजूर ज्योती प्रकाश म्हात्रे या रायगड मजूर फेडरेशनमधील कर्मचारी प्रकाश वसंत म्हात्रे यांच्या पत्नी आहेत.सहायक निबंधकांनी मागवला अहवालजिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक यांच्याकडून नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थामधील संस्थांच्या लेखापरीक्षण अहवालामधील मजुरांची यादी, मजूर सभासदांचे पत्ते, संस्थेचे कार्यक्षेत्र या मजूर सभासदांनी जोडलेल्या तलाठी अथवा तहसीलदार यांच्याकडील अ धारिकेतील मजूर दाखल्याची प्रत, या मजूर सभासदांना सहायक निबंधक कार्यालयाने दिलेली मंजुरीची पत्रे व मजूर सहकारी संस्थांचे नोंदणीकृत पत्ते ही माहिती तत्काळ जिल्हा उपनिबंधक यांनी संकलित करून आपल्याला द्यावी, अशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका यांनी या प्रकरणी जिल्ह्यातील सर्व सहायक निबंधक यांच्याकडून तातडीने अहवाल मागविण्यात आला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकRaigadरायगड