शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 02:01 IST

देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले.

वडखळ : देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले.पेण येथील एम्पथी फाउंडेशन मुंबई यांनी बांधलेली नूतन इमारत सुहित जीवन ट्रस्टच्या सुमंगल गतिमंद (बौद्धिक अक्षमता) मुलांची शाळेचे उद्घाटन व ए.डब्ल्यू.एम.एच. महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येणाऱ्या शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री रवि पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, एम्पथी फाउंडेशनचे रमेश दमाणी सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा पाटील आदी मान्यवरांसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.दिव्यांगांना समाजाचे समर्थन मिळाले पाहिजे त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळाले तरच ते आत्मविश्वासाने जगू शकतील, समाजातील सदृढ लोकांनी त्यांच्याबाबत सहनशीलतेचे भान ठेवून त्यांना मदत करणे कर्तव्य मानले पाहिजे, असे विचार गडकरी यांनी मांडले.या वेळी सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या तर्फे या शाळेला एक कोटी रु पयांचा मदतनिधी देत असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले. कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या विद्यार्थिनींनी नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व उपस्थित मान्यवरांना बांधल्या.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRaigadरायगड