‘विविध योजनांद्वारे विकासाचा संकल्प’

By Admin | Updated: November 16, 2016 04:36 IST2016-11-16T04:36:54+5:302016-11-16T04:36:54+5:30

केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विविध योजना घेऊन आम्ही विकास करण्याचा संकल्प केला

'Resolution of development through various schemes' | ‘विविध योजनांद्वारे विकासाचा संकल्प’

‘विविध योजनांद्वारे विकासाचा संकल्प’

मुरुड : केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विविध योजना घेऊन आम्ही विकास करण्याचा संकल्प केला आहे. आगामी नगरपरिषदेत स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तींना मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे नगरविकासमंत्री प्रकाश मेहता यांनी केले. मुरुड नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रथमच रिंगणात उतरलेल्या भाजपाची भूमिका स्पष्ट करताना पत्रकार परिषदेत मेहता बोलत होते.
मुरु ड नगरपरिषदेला नगरविकास फंडातून २ कोटींचा निधी देताना कधीही पक्षीय विचार आणला नाही, आणणार नाही, कारण विकासाचा संकल्प घेऊन भाजपा देशभरात कार्यरत असल्याचे सांगून देशातील जनतेच्या मनात आशादायी चित्र निर्माण होत आहे, याबद्दल आनंद वाटतो. ३० वर्षांच्या राजकीय जीवनाचा अनुभव सार्थकी लागल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युतीचे १०० टक्के प्रयत्न झालेत; परंतु मित्र पक्षाला रायगडात कमळ फुलू द्यायचे नाही, असा टोला त्यांनी लगावला. शेकापचा समाचार घेताना मेहता म्हणाले की, शेकापचे राजकारण सोयीचे असते. दोन-तीन तालुक्यांपुरता पक्ष कधीही अधिकृत विरोधी पक्ष होऊ शकत नाही, याचा जनतेने विचार करावा.
मुरु ड तालुक्यात आठवड्यात सुमारे ५० हजार पर्यटक येतात. ही संख्या १ लाखापर्यंत गेली पाहिजे जेणेकरून भूमिपुत्रांना रोजगार, व्यवसाय मिळेल. रस्ते व्यवस्थापन सुधारण्यासाठी शासन स्तरावर गांभीर्याने प्रयत्न करत आहे. छ. शिवरायांच्या रायगडावर शिवसृष्टी उभारण्यासाठी शासनाने ५२७ कोटींची तरतूद केल्याचे सांगून देश-विदेशातील पर्यटकांचे ते आकर्षण ठरेल याची त्यांनी ग्वाही दिली.
याप्रसंगी आम. प्रशांत ठाकूर, निवडणूक प्रभारी नंदकुमार पटवर्धन, रायगड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी आदी उपस्थित होते.

Web Title: 'Resolution of development through various schemes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.