शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

रायगड जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण निश्चित, निधी चाैधरी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 00:28 IST

Raigad News : रायगड जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी तसेच महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आली आहे.

रायगड : जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी तसेच महिलांसाठी आरक्षित करून संख्या निश्चित करण्यात आली आहे. यासाठी २०११च्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली.रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या एकूण ८०९ पदातील अनुसूचित जातीसाठी ३३ ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यातील खुल्या प्रवर्गासाठी १६ तर १७ पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत.अनुसूचित जमातीसाठी १२४पैकी खुल्या प्रवर्गासाठी ६२ व महिलांसाठी ६२ पदे, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण २१८ पदांपैकी १०९ पदे महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे आरक्षित असणार आहेत, असे चाैधरी यांनी स्पष्ट केले. सर्वसाधारण जागांसाठी एकूण ४३४ पदांपैकी खुल्या प्रवर्गासाठी २१७ तर महिलांसाठी २१७ पदे राखीव असणार आहेत.तालुकानिहाय सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे अलिबाग- ग्रामपंचायत संख्या - ६२, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-०, अनु.जमाती आरक्षित जागा-खुला ६, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे-खुला ८, महिला ९, सर्वसाधारण जागा-खुला १७, महिला १६.मुरूड- ग्रामपंचायत संख्या- २४, अनु. जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-०, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला २, महिला ३, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ३, महिला ३, सर्वसाधारण जागा- खुला ६, महिला ६.पेण- ग्रामपंचायत संख्या- ६४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-०, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ७, महिला ७, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ९, महिला ८, सर्वसाधारण जागा- खुला १६, महिला १६. पनवेल- ग्रामपंचायत संख्या- ७१, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-२, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ६, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला १०, महिला ९, सर्वसाधारण जागा- खुला १९, महिला १९.उरण- ग्रामपंचायत संख्या- ३५, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-०, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला १, महिला २, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ५, महिला ४, सर्वसाधारण जागा- खुला ११, महिला ११.कर्जत- ग्रामपंचायत संख्या- ५४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ८, महिला ६, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ७, महिला ८, सर्वसाधारण जागा- खुला १०, महिला ११. खालापूर- ग्रामपंचायत संख्या- ४४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ५, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा- खुला १०, महिला १०.रोहा- ग्रामपंचायत संख्या- ६४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-२, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ५, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ८, महिला ९, सर्वसाधारण जागा- खुला १७, महिला १७.सुधागड- ग्रामपंचायत संख्या- ३४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-०, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ६, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ५, महिला ४, सर्वसाधारण जागा- खुला ६, महिला ७.माणगाव- ग्रामपंचायत संख्या- ७४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-२, महिला-२, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ४, महिला ३, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला १०, महिला १०, सर्वसाधारण जागा- खुला २१, महिला २२.तळा- ग्रामपंचायत संख्या- २५, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला २, महिला २, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ३, महिला ४, सर्वसाधारण जागा- खुला ६, महिला ६.महाड- ग्रामपंचायत संख्या- १३४, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-३, महिला-३, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ४, महिला ५, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला १८, महिला १८, सर्वसाधारण जागा- खुला ४२, महिला ४१.पोलादपूर- ग्रामपंचायत संख्या- ४२, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-२ अनु.जमाती आरक्षित जागा- खुला १, महिला २, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ६, महिला ५, सर्वसाधारण जागा- खुला १३, महिला १२. श्रीवर्धन- ग्रामपंचायत संख्या- ४३, अनु,जाती आरक्षित जागा- खुला-०, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला ३, महिला ३, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ६, महिला ६, सर्वसाधारण जागा- खुला १२, महिला १२.म्हसळा- ग्रामपंचायत संख्या- ३९, अनु.जाती आरक्षित जागा- खुला-१, महिला-१, अनु.जमाती आरक्षित जागा- खुला २, महिला २, नामाप्र आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला ५, महिला ६, सर्वसाधारण जागा- खुला ११, महिला ११.रायगडमध्ये अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षित जागाखुला-१६, महिला-१७ अनुसूचित जमाती आरक्षित जागा- खुला ६२, महिला ६२, नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित जागा २७ टक्केप्रमाणे- खुला १०९, महिला १०९, सर्वसाधारण जागा- खुला २१७, महिला २१७.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचRaigadरायगड