शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चार जिल्ह्यांतील ६४ खासगी खारभूमी योजनांचे नूतनीकरण, भातशेती बहरण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 07:00 IST

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील एकूण ६४ खासगी खारभूमी योजनांची संपूर्ण नूतनीकरणाची कामे हाती घेऊ न एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र पुन:प्रापित करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या खारलॅण्ड विभागाच्या माध्यमातून करण्यात आले

- जयंत धुळपअलिबाग : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील एकूण ६४ खासगी खारभूमी योजनांची संपूर्ण नूतनीकरणाची कामे हाती घेऊ न एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र पुन:प्रापित करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या खारलॅण्ड विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. परिणामी कोकणात पुन्हा एकदा भातशेती बहरून येण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.खारभूमी योजनांचा इतिहास हा फार जुना आहे. पूर्वी समुद्रग्रस्त जमिनीच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या बांधांची व उघाड्यांची देखभाल त्यावेळचे शेतकरी स्वखर्चाने करीत होते. १९४८ साली त्यावेळच्या मुंबई राज्याच्या शासनाने ‘मुंबई खारभूमी अधिनियम १९४८’ हा अधिनियम संमत करून त्या भूमीला व त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. या अधिनियमाने शासनांतर्गत भूभागाच्या संरक्षणास बांधाची जबाबदारी शासनाने अंशत: उचलण्याचे मान्य करून अस्तित्वात असलेल्या तसेच नवीन करण्यात येणाºया खारभूमी बांध बांधण्यासाठी येणाºया खर्चात भागीदार होण्याचे स्वीकारले. तसेच या खारभूमी बंधारा संरक्षक बांधांची संरक्षण व्यवस्था ही या अधिनियमाने नियमित केली. यासाठी स्वतंत्र खारभूमी बोर्डामार्फत व्यवस्थापन पहाण्यात येवू लागली. यामध्ये ‘५० टक्के शासन व ५० टक्के लोकवर्गणी’ असा खर्च करण्यात येवूलागला.जे लाभधारक शेतकरी ‘५० टक्के शासन व ५० टक्के लोकवर्गणी’ या योजनेमध्ये सामील झाले व त्यांनी खारभूमी बंधाºयाच्या संरक्षणासाठी येणाºया खर्चाची ५० टक्के रक्कम भरली अशा योजनांच्या खारभूमी योजनांची कामे तत्कालीन खारलॅण्ड बोर्डाने केली. जे शेतकरी व लाभधारक लोकवर्गणीद्वारे खारभूमी काम करण्यास तयार झाले नाहीत, त्या शेतकºयांनी बांधलेल्या योजनांना खासगी खारभूमी योजना संबोधण्यात येते.अशा ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत एकूण ६४ खासगी खारभूमी योजनांची संपूर्ण नूतनीकरणाची कामे हाती घेऊ न एकूण ६ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र पुन:प्रापित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.रोहयोजनेतून खासगी योजनांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव१खासगी योजनेच्या दुरुस्तीचा खर्च लाभधारक शेतकरी स्वत: करीत होते. खासगी योजनांची ही कामे शासनामार्फत व्हावी अशी मागणी लाभधारक शेतकºयांची आहे. खासगी योजनांच्या नादुरुस्त बांधामधून खारे पाणी शिरून ते लगतच्या शासकीय खारभूमी योजनेत घुसून शासकीय खारभूमी योजनांच्या पिकाखाली असलेल्या क्षेत्राला धोका पोहचत आहे.२काही अंशी शासकीय खारभूमी योजनांच्या बांधांना खांडी पडून (बांध फुटून) त्यामुळे शासकीय खारभूमी योजनांच्या देखभाल दुरूस्ती खर्चात वाढ होत आहे. शासन पत्रान्वये शासनाने खाजगी खारभूमी योजना शासनाने ताब्यात घेवू नये तथापि खासगी खारभूमी योजनांची दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हाधिकाºयांची मंजुरी प्राप्त करून घेवून करण्यास हरकत नाही, असा निर्णय शासनाने घेतला होता, परंतु त्याचा फायदा होवू शकला नाही. परिणामी खासगी खारभूमी योजना शासनाच्या ताब्यात घेण्याचा विचार श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी शासनापुढे मांडला.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड