शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून रखडले शाळेचे नूतनीकरण, जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 01:54 IST

मुरु ड नगरपालिकेची बाजारपेठेतील शाळा नंबर-१ ही १०० वर्षे जुनी आहे. शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, कलावंत या शाळेने घडवले आहेत. मात्र, सध्या शाळेची दुरवस्था झाली आहे.

- संजय करडेमुरु ड जंजिरा  -  मुरु ड नगरपालिकेची बाजारपेठेतील शाळा नंबर-१ ही १०० वर्षे जुनी आहे. शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, कलावंत या शाळेने घडवले आहेत. मात्र, सध्या शाळेची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे शाळेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.चार वर्षांपासून सुरू असलेले काम पूर्ण होत नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत ठेकेदाराकडे विचारणा केली असता, वाळू मिळत नसल्याचे उत्तर देण्यात आले. लोकप्रतिनिधींचेही याबाबत दुर्लक्ष होत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येतआहे.आगामी शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी नवीन इमारतीचे काम होणे गरजेचे आहे. शाळेच्या जुन्या इमारतीतील जिना, पीलर जीर्ण झाले असून लाद्याही तुटल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.मुरुड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, नगरपालिकेच्या १ नंबर शाळेचे काम चार वर्षांपासून रखडवल्यामुळे सदरील ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार होतो; परंतु ठेकेदाराच्या विनंतीवरून त्याला मुदतवाढ देण्यात आली असून, जून महिन्यापर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.शाळा क्रमांक १ कोळी वाड्यालगत आहे, त्यामुळे येथील मुले या ठिकाणी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. शाळा १०० वर्षे जुनी असल्याने नूतनीकरणाची गरज आहे, अन्यथा मुलांच्या जीवास धोका उद्भवू शकतो. नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी या वेळी पालकांकडून होत आहे.शाळेची नवीन इमारतीसाठी जिल्हा नगरोत्थानमधून ५६ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. ठेकेदाराकडून चार वर्षांपासून काम रखडल्याने त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत येत्या जून महिन्यात नवीन इमारतीमध्ये मुलांना शिक्षण घेता येईल, यासाठी प्रयत्न करू.- दयानंद गोरे, मुख्याधिकारी,मुरु ड नगरपरिषद

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र