शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 11:56 IST

किल्ले रायगडावर ५ ठिकाणी विविध घरट्यांच्या ओसरींवर मंकला खेळ पाहण्यास मिळतात. ‘आर्ट ऑफ प्लेइंग’ आणि ‘आपला कट्टा’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मे महिन्यात बैठ्या खेळांची शोधमोहीम घेतली होती.

अलिबाग : येथील समुद्रात असलेल्या खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीवर मंकला आणि वाघबकरी खेळाचे १२ अवशेष नुकतेच सापडले. हे अवशेष १६, १७व्या शतकातील आहेत. किल्ले रायगडावर ५ ठिकाणी विविध घरट्यांच्या ओसरींवर मंकला खेळ पाहण्यास मिळतात. ‘आर्ट ऑफ प्लेइंग’ आणि ‘आपला कट्टा’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मे महिन्यात बैठ्या खेळांची शोधमोहीम घेतली होती. यात बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले, ममता भोसले, केतकी पाटील, सिद्धेश गुरव, अनिकेत पाटील यांनी सहभाग घेतला. 

खांदेरीच्या तटबंदीवर खेळांचे कोरीव अवशेष मिळाले.  दुर्गाभोवतीच्या तटबंदीवर विविध ठिकाणी हे कोरलेले आहेत. या पटांमध्ये ‘मंकला’ हा खेळ प्रामुख्याने पाहायला मिळतो. जमिनीवर समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात ते आठ किंवा त्याहूनही अधिक खड्डे पाहायला मिळतात. 

गणिताचे कौशल्य वाढवणारा हा खेळ जगभर विविध नावाने प्रसिद्ध आहे. खांदेरीवर या खेळाचे एकूण १० पट शोधमोहिमेत सापडले आहेत. एका मंक पटावर समोरासमोर सात किंवा आठ खड्ड्यांऐवजी एकूण २७ खड्डे (एकाच पटात) आहेत. खेळाचे हे नवे स्वरूप आफ्रिकेमधील ‘बाओ’ या खेळाशी मिळते-जुळते आहे. 

काय आहेत हे खेळ? 

खांदेरी येथे सापडलेला दुसरा खेळ ‘वाघबकरी’ आहे. एका विशिष्ट प्रकारची रचना असलेल्या या खेळाचे महाराष्ट्रात ४ ते ५ वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. 

वाघाने जास्तीत जास्त बकरीची शिकार करायची आणि बकरीने बचाव करून वाघास कोंडीत पकडायचे,  असे नियोजन कौशल्य वाढवणारा हा खेळ आहे. 

सरेखन पद्धती वापरून शिकारीचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळ महाराष्ट्रातील समुद्री किल्ल्यावर सापडलेला पहिलाच खेळ आहे.

खेळाच्या माध्यमातून मनोरंजन

देशात मंकला खेळ कधीपासून आहे, याचा संदर्भ नाही. पण, वेगवेगळ्या राज्यांत या खेळाला वेगवेगळी नावे आहेत. सातगोल, सातगोटी, गोगलगाय, गायव्याली ही काही मराठी-हिंदी नावे.

गुरुपल्यान हे या खेळाचे कोंकणी नाव. राज्यातील कार्ले, भाजे, बेडसे, आगाशीव, गडद लेणी या ठिकाणी हा खेळ कोरलेला आहे. 

‘मंकला’ हा आफ्रिकेत प्रचलित आहे.  खांदेरीवर सापडलेले हे पट त्या खेळांचा कालखंड सिद्ध करतो. १७ व्या शतकात बांधलेला हा किल्ला शिवरायांच्या सामुद्रिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. इथे असलेले सैन्य या खेळाच्या माध्यमातून मनोरंजन करत असावेत. 

टॅग्स :historyइतिहासalibaugअलिबागRaigadरायगड