शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चिर्ले एमटी यार्डमध्ये मिलनासाठी एकत्र आलेल्या दोन नर-मादी अजगरांची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:33 IST

वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडून नैसर्गिक आवासात सोडून दिले

मधुकर ठाकूर, उरण: चिर्ले येथील एका एमटी कंटेनर यार्डमध्ये बुधवारी (२९) सकाळी मीटिंगसाठी एकत्र आलेल्या दोन नर-मादी अजगर आढळून आले होते.एकाच वेळी एकाच ठिकाणी आढळून आलेल्या नरमादी अजगरांना वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी मोठ्या शिताफीने पकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक आवासात सोडून दिले.

बुधवारी सकाळीच उरण तालुक्यातील चिर्ले येथील एका एमटी कंटेनर यार्डचे सुपरवायझर कुणाल पाटील यांनी यार्डमध्ये भले मोठे अजगर आढळून आले असल्याची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना दिली होती.वनजीव संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी सदस्य नितीन मढवी,साहिल घरत यांनी माहिती मिळताच एमटी कंटेनर यार्डकडे धाव घेतली. या कंटेनर यार्डमध्ये कंपाऊंडच्या बाजूलाच दोन नरमादी अजगर मिलनासाठी एकत्र आल्याचे आढळून आले.एक ९ फुट लांबीचा नर आणि ८.५० फूट लांबीची मादी असे आढळून आलेल्या दोन इंडियन पायथॉन जातीच्या नरमादी अजगरांना संस्थेच्या सदस्यांनी शिताफीने पकडले. आढळून आलेल्या दोन्ही नरमादी अजगरांची  माहिती वनजीव संस्थेच्या सदस्यांनी वनविभागाला दिली.वनअधिकारी संतोष इंगोले यांनी दोन्ही अजगरांची तपासणी केली.तपासणीनंतर दोन्ही नरमादी अजगरांना चिर्ले येथील दुधेला डोंगराच्या नैसर्गिक आवासात वनधिकारी यांच्या समक्ष मुक्त करण्यात आले.

टॅग्स :uran-acउरण