शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीए बंदरातून २०२०-२३ या आर्थिक वर्षात ६०.०५ दशलक्ष कंटेनर मालाची विक्रमी हाताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:52 IST

जेएनपीए बंदराअंतर्गत असलेल्या पाचही बंदराने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात कंटेनर मालाची हाताळणी केलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी सोमवारी ( ३) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीए बंदराने २०२२- २०२३ या आर्थिक वर्षात ६०.०५ दशलक्ष कंटेनर मालाची हाताळणी केली आहे.मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी ६.४ टक्के वाढ झाली असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.जेएनपीए बंदराअंतर्गत असलेल्या पाचही बंदराने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात कंटेनर मालाची हाताळणी केलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी सोमवारी ( ३) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला जेएनपीए बंदराचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ, वरिष्ठ प्रबंधक तथा सेक्रेटरी जयवंत ढवळे, मार्केटिंग मॅनेजर अंबिका सिंग तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना माहिती देताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी देशातील एकूण बंदरातील  जेएनपीएने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ६०.०५ दशलक्ष कंटेनर मालाची विक्रमी हाताळणी केली आहे.यामध्ये बीएमसीटी -१७ लाख १४ हजार २४६(टीईयुस) ,एनएसआयसीटी-१८ लाख ४६ हजार ९२०(टीईयुस), एपीएमटी--११ लाख ३७ हजार ०३४ (टीईयुस) , एनएसआयजीटी- ०२ लाख ०५ हजार ९०७ (टीईयुस) , जेएनपीसीटी- ४९ हजार ७०७ (टीईयुस) आदी बंदरांचा समावेश असल्याचे सेठी यांनी सांगितले. जेएनपीए बंदरातुन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात कंटेनर मालाची हाताळणी केलेली वाहतूक विक्रमी आहे.याची नोंद रेकॉर्ड बुकात लवकरच होणार आहे.

या अनाकलनीय यशाची बातमी शेअर करताना सेठी यांनी आनंद व्यक्त केला.जेएनपीए बंदर एक्झिम व्यापारासाठी एक परिपूर्ण बंदर बनवण्याची आमची वचनबद्धता सिद्ध करते. बंदरातील ग्राहकांना सर्वोत्तम  सातत्यपूर्ण सेवा देण्याच्या प्रयत्नांचे आणि वचनबद्धतचे हे प्रतीक आहे. जेएनपीएवर विश्वास ठेवल्याबद्दल सर्व भागीदार आणि भागधारकांचे आभार व्यक्त करतानाच जेएनपीए देशाच्या आर्थिक विकासाचा मार्ग कायम राखण्यासाठी आपल्या भमिूकेसाठी वचनबद्ध आहे.”अशी ग्वाहीही जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.यावेळी केक कापून यशाचा आनंद साजरा करण्यात आला.

टॅग्स :uran-acउरण