शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबोतच्या संबंधांवर काय म्हणाले?
3
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
4
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
5
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
6
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
7
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
8
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
9
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
10
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
12
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
13
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
14
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
15
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
16
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
17
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
18
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
19
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
20
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेतील लाभार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:24 IST

आवास दिन साजरा; माणगाव पंचायत समितीचा गृहप्रवेशाचा आगळा उपक्रम

माणगाव : आवासदिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील माणगाव पंचायत समितीच्या माध्यमातून माणगाव पंचायत समितीमध्ये विळे, निजामपूर, साई आणि गांगवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील घरकूल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ज्या घरकुलाचे काम परिपूर्ण झाले त्या लाभार्थ्यांच्या घरकुलावर गुढी उभारून आगळ्या वेगळ्या पद्धतीने गृहप्रवेश केला.भारतीय राज्यघटनेच्या संविधानिक तरतुदीची अंमलबजावणी केली. शासनाच्या नवसंकल्पनेनुसार सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे हे शासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सन २०१९/२० मध्ये खालील योजनांच्या माध्यमातून मंजूर घरकुले या प्रमाणे संपूर्ण माणगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ७१ घरे पूर्ण केली. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून ४५, शबरी घरकूल योजना ४५, आदिम जमाती घरकूल योजना ५० तसेच आदिम जमाती घरकूल योजना सन २०१८/ १९ मधील लाभार्थ्यांस पुढीलप्रमाणे मंजुरी येऊन घरकुले पूर्ण केलेली आहेत. आदिम जमाती घरकूल योजना २७ मंजूर होऊन पूर्ण झाली आहेत. या योजनांच्या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी आणि घरकुले लवकर परिपूर्ण व्हावी, यासाठी शासनस्तरावर १८ नोव्हेंबर हा आवासदिन साजरा केला जातो.माणगाव पंचायत समितीच्या माध्यमातून सत्कार करण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत विळे येथील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी धोंडीबा जानू कोकरे, निजामपूर ग्रामपंचायतीमधील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी नथुराम रघुनाथ हिलम, साई ग्रामपंचायतमधील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी पांड्या पुतळ्या पवार, गांगवली ग्रामपंचायतीमधील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी चंद्रकांत गंगाराम हिलम आणि आदिम जमाती आवास योजनेचे लाभार्थी प्रदीप दीपक मुकणे, संदीप नथुराम जाधव आणि केशव गौऱ्या जगताप या सात लाभार्थ्यांना माणगाव पंचायत समितीचे कार्यक्षम आणि कार्यतत्पर गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर गांगवली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पळसगाव खुर्द आदिवासीवाडी येथील आदिम जमाती आवास योजनेचे लाभार्थी संदीप नथुराम जाधव यांच्या घरकुलाच्या समोर गुढी उभारून माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी सर्व उपस्थितांच्या साक्षीने लाभार्थी दाम्पत्यांच्या समवेत गृहप्रवेश करून सर्वांना सदर योजनेसंबंधी सखोल आणि मौलिक असे मार्गदर्शन केले.या वेळी माणगाव पंचायत समिती सभापती सुजीत शिंदे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, गटशिक्षणाधिकारी नाखले, माजी सभापती राजेश पानवकर, पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, वजीर चौगुले, रणजीत लवटे आदी उपस्थित होते.