शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये विधानसभेसाठी बंडखोरीची शक्यता; महायुती, महाविकास आघाडीत धुसफुस वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 15:21 IST

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. अलिबाग, महाड, कर्जत हे मतदारसंघ शिंदेसेनेकडे तर पेण, पनवेल हे भाजपकडे आहेत.

अलिबाग : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम हा गणेशोत्सवानंतर रंगणार आहे. मात्र, त्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह रंगला आहे. विद्यमान आमदारांविरोधातच इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीत कर्जत, श्रीवर्धन, उरण व महाड या मतदारसंघांमध्ये बंडखोरी अटळ दिसत आहे.  

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. अलिबाग, महाड, कर्जत हे मतदारसंघ शिंदेसेनेकडे तर पेण, पनवेल हे भाजपकडे आहेत. उरणमध्ये अपक्ष आमदार आहेत, श्रीवर्धन मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे. या सातही मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. सध्या विद्यमान आमदाराला मतदारसंघ सोडला जाईल, असे महायुतीचे सूत्र दिसते. महायुतीतच अनेक इच्छुक  आहेत. 

मविआत बिघाडी? -  उरण मतदारसंघात मविआचे उद्धवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकापचे राजेंद्र पाटील यांनी तयारी सुरू केली. येथे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. -  महाड मतदारसंघात ठाकरे सेनेच्या स्नेहलता जगताप इच्छुक आहेत, काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा केला. पनवेल आघाडीतील काँग्रेस, शेकाप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.

अलिबागमध्ये शेकाप-काँग्रेसमध्ये रस्सीखेच-  अलिबाग मतदारसंघात शिंदेसेनेचे महेंद्र दळवी हे आमदार आहेत. मात्र, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. ते मतपेरणी करत आहेत. -  नुकतेच अलिबागमधील अधिवेशनात भाजपने विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकले. तर, आघाडीमध्येही शेकाप आणि काँग्रेस यांच्यात उमेदवारीवरून धुसफूस सुरू आहे. -  शेकापकडून चित्रलेखा पाटील, माजी आमदार पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील हे उमेदवार तयारीत आहेत. काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. प्रवीण ठाकूर हेसुद्धा इच्छुक आहेत. 

थोरवे-घारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप -  कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे महेंद्र थोरवे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी थेट प्रचारच सुरू केला आहे. -  घारे आणि थोरवे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.  विधानसभा निवडणूक लढायची आहे. विरोधकांनी वीट मारली तर दगडाने उत्तर दिले जाईल, असा थेट इशाराच घारे त्यांनी दिला आहे.  

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी