शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 04:29 IST

रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात

उरण : तालुक्यातील रानसई, विंधणे, चिरनेर, दिघोडे, गावातील शेतकरी रानसई धरणाच्या कुशीत पिकवत असलेल्या शिराळी, दुधी, घोसाळी, पडवळ, काकडी, डेटी आदी चविष्ठ भाज्यांना गणेशोत्सवात मुंबईतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात पोहोचू लागला आहे.उरण तालुक्यातील जनतेला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण आहे. या परिसरातील पडीक जमिनीवर रानसई गावातील आदिवासी बांधवांनी, तसेच विंधणे, चिरनेर, दिघोडे गावातील शेतकऱ्यांनी गेली २५ वर्षे या पडीक जमिनीवर मशागत करण्यास सुरुवात केली. मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्याने दिवसाला १० ते १५ हजार किलो भाजी येथील शेतकरी पिकवत आहेत. पिकवलेली भाजी चार-पाच कि.मी. अंतर पायी पार करून पनवेल, वाशी आणि मुंबईच्या बाजारात पोहोचवतात.रानसई धरणाच्या परिसरातील पडीक जमिनीकडे नजर टाकली, तर शिराळी, घोसाळी, कारली, दुधी, काकडी यांसारख्या इतर भाज्यांच्या रांगा तांबड्या मातीत फुललेल्या दिसतात. त्यात डेटी, भाज्या यांची रोपे डोलताना दिसतात. रानसई, विंधणे, चिरनेर येथील शेतकºयांच्या जमिनी शासनाने रानसई धराणाच्या उभारणीसाठी १९७० साली संपादित केल्या, त्यानंतर शेतकरी, प्रकल्पग्रस्त नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते रानसईच्या पडीक जमिनीवर गेली २५ ते ३० वर्षे भाजीपाल्याचे, तसेच वाल, चवळी, पावटा, मूग या कडधान्यांचे उत्पन्न घेत आहेत.३० हजार किलो भाजीभाजीपाला चविष्ठ असल्याने मुंबईतून भाजीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी २० ते ३० हजार किलो भाजी मार्केटमध्ये पाठवत असतात; परंतु पावसाच्या लहरीपणामुळे भाजीचे उत्पन्न काही वेळा घटत आहे. या भाजीच्या मळ्यांद्वारे ३० कुटुंबे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.शासनाने, कुषी विभागाने शेतकºयांना सहकार्य केले, तर अंगमेहनतीतून भाजीच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल, असा विश्वास या शेतकºयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :vegetableभाज्याRaigadरायगड