शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:45 IST

जिल्ह्यात सर्वात जास्त अलिबागमध्ये १२५ मिमी तर सर्वात कमी खालापूर तालुक्यात ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अलिबाग : जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट मिळाल्यानंतर, बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्याचा वारा असा मान्सूनचा झंझावात कायम राहिला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर गुरुवारपासून लॉकडाऊन होणार म्हणून खरेदीला बाहेर पडलेल्या नागरिकांना खरेदी करता आली नाही. पावसाचा जोर कायम राहिल्याने नागरिक चिंतेत होते. जिल्ह्यात सर्वात जास्त अलिबागमध्ये १२५ मिमी तर सर्वात कमी खालापूर तालुक्यात ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनाºयाजवळील गावे, खाडी किनाºयावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा सोमवारी देण्यात आला होता. तर मंगळवारी पहाटेपासून पडणाºया पावसामुळे नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली होती, तर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ जुलैपर्यंत पाऊस कोसळण्याचे प्रमाण अधिक असणार आहे. यामुळे सलग तीन दिवस रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी, नदी, खाडी आणि दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ५५.७४ मिमी पाऊस रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५५.७४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तसेच १ जूनपासून १५ जुलै बुधवारपर्यंत एकूण सरासरी ११९४.१९ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये अलिबाग १२५.०० मिमी, पेण १७ मिमी, मुरुड ७७ मिमी, पनवेल ३० मिमी, उरण ५७ मिमी, कर्जत ३१.२० मिमी, खालापूर ८ मिमी, माणगांव ५७ मिमी, रोहा ११४.३० मिमी, सुधागड ५८ मिमी, तळा ४४ मिमी, महाड ३३ मिमी, पोलादपूर ७१ मिमी, म्हसळा ६५ मिमी, श्रीवर्धन ८२ मिमी, माथेरान २२.४० मिमी असे आजचे एकूण पर्जन्यमान ८९१.९० मिमी इतके आहे. त्याची सरासरी ५५.७४ मिमी इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी ३७.१३ टक्के इतकी आहे.

टॅग्स :Rainपाऊस