शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"...तोपर्यंत भरतशेठला कोणीही हरवू शकत नाही"; मुलाच्या विजयानंतर भरत गोगावलेंनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:04 IST

रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले विजयी झाले आहेत.

Raigad ZP Election: रायगड जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीचा निकाल अखेर हाती आला असून, राजकीय समीकरणे आणि वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत महायुतीने मुसंडी मारली आहे. महाड आणि अलिबाग या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. नडगाव बिरवाडी या प्रतिष्ठेच्या गटातून राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी दणदणीत विजय मिळवला असून, अलिबागमध्ये आमदार महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी यांनी विजयाचा चौकार मारला आहे.

विकास गोगावलेंचा 'वनवास' संपला; मतदारांचा कौल पदरातनडगाव तर्फे बिरवाडी या गटातून विकास गोगावले यांचा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. काही महिन्यांपूर्वी महाड नगर परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या राडा प्रकरणामुळे विकास गोगावले कायदेशीर कचाट्यात सापडले होते. या प्रकरणात त्यांना काही काळ फरार घोषित करण्यात आले होते, तसेच सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांनंतर पोलिसांसमोर हजर व्हावे लागले होते. विरोधकांनी या प्रकरणाचा प्रचारात मोठा मुद्दा केला होता. मात्र, विकास गोगावले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

या निकालानंतर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले यांनी हा जनतेचा विजय असल्याचे सांगत केलेल्या कामाचा मोबदला मिळाल्याचे सांगितले. "हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारतोय. जे काम करतोय त्यामुळे जनतेने स्विकारले आहे. मी नेहमीच सांगत आलोय जो पर्यंत भरतशेठची नियत आणि नीतीमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, हा माझा दावा होता. गोरगरिब जरी आला तरी तो आपला मतदार असतो, सहकार्य करणारा असतो. त्याचा अवमान करणे आपल्याला शक्य नाही. जरी काही झालं तरी आम्ही त्याच्या पाठीमागे असतो. त्याचा मोबदला जनतेने मला दिला आहे," असं भरत गोगावले म्हणाले.

मानसी दळवींचा 'चौकार' आणि अध्यक्षपदाची चर्चा

अलिबागच्या थळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी ६,००० मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. मानसी दळवी यांचा हा सलग चौथा विजय असल्याने त्यांचा जिल्हा परिषदेतील अनुभव दांडगा आहे. या विजयानंतर आता रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असून, जिल्ह्याच्या पहिल्या नागरिक म्हणून त्यांच्या गळ्यात माळ पडण्याची  शक्यता वर्तवली जात आहे.

अमित नाईक विजयी

जिल्ह्यात केवळ शिवसेनाच नव्हे, तर राष्ट्रवादीनेही (अजित पवार गट) आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीने ३ जागांवर विजय मिळवला असून, यामध्ये अमित नाईक यांच्यासह दोन उमेदवारांनी बाजी मारली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bharat Gogawale: No one can defeat me while I'm righteous.

Web Summary : Bharat Gogawale's son wins Raigad ZP election. Gogawale attributes victory to his good intentions and public support. Mansi Dalvi secured a fourth victory, potentially for president post. NCP also won seats.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५RaigadरायगडShiv Senaशिवसेना