शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा परिषदेचा ७१ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:29 IST

बांधकाम विभागाला झुकते माप : खडतर काळात उत्पन्न वाढल्याने सर्वपक्षीयांचा पाठिंबा

अलिबाग : पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या उत्पन्नावर प्रचंड विपरित परिणाम झाला असतानाच, अर्थ व बांधकाम सभापती आस्वाद पाटील यांनी २०१८-१९ चा तब्बल ७१ कोटी ७६ लाख रुपयांचा अंतिम सुधारित अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. सर्व घटकांना अर्थसंकल्पात न्याय दिल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही बाके वाजवून अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला.

रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात गुरुवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली नसती, तरी भविष्यात तेथील विकासकामांवर मर्यादा आली असती आणि त्यामुळे उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधावेच लागले असते, असे आस्वाद पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाबाबत सर्वांच्याच मनामध्ये सांशकता होती; परंतु प्रशासकीय अधिकारी आणि सभापती, सदस्य यांच्या सहकार्यामुळे विविध मार्गाने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ करण्याचे पर्याय शोधता आले. त्यामुळेच २०१९-२० मूळ अर्थसंकल्प १०६ कोटी रुपयांवर नेता आला, असे त्यांनी स्पष्ट केले. २०१८-१९ सालचा सुधारित तब्बल ७१ कोटी ७६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे विकासकामे करूनही रक्कम मिळाली नव्हती. त्यांना त्यांच्या कामाचे पैसे आता प्राप्त होण्यातील अडथळा दूर केला आहे. ३१ मार्चपूर्वी तातडीने अर्थ विभागातील सर्व सोपस्कार पूर्ण करावेत, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनीही कौतुक केले. या अर्थसंकल्पात सर्व घटकांना सामावून घेतल्याबद्दल शेकापच्या नीलिमा पाटील, चित्रा पाटील, सुरेश खैरे यांच्यासह विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, चंद्रकांत कळंबे त्याचप्रमाणे भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांनीही अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला.रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना. पाटील सभागृहात गुरुवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे होत्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे, कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते.पेण येथे डायलेसिस सेंटर उभारणारच्पेण येथे डायलेसिस सेंटर उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तेथे सहा खोल्या आणि पाच मशिन्स सीएसआर फंडातून घेण्यात येणार आहेत. सहा टेक्निशियन्स, सहा नर्सेस आणि चार कर्मचारी ठेवण्यात येणार आहेत.च्रुग्णांना फक्त दीड हजार ते १८०० रुपयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फायदा पोलादपूर, महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या विभागातील रुग्णांना होणार असल्याचे आस्वाद पाटील यांनी सांगितले. रुग्णांकडून कमी रक्कम घेण्यात येणार असली, तरी महिन्याला सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यातूनच सर्व खर्च भागवण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कृषीसाठी के वळएक कोटीतरतूदच्रायगड जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा आहे. शेतीचा बहुतांश भाग हा ग्रामीण भाग आहे. याच कृषी विभागासाठी फक्त एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यातील कृषी क्षेत्राचा विकास कसा होणार? असा प्रश्न उपस्थित होतो.अर्थसंकल्पावर नजरच्१९७१ साली राज्यात जिल्हा परिषद स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेचा पहिला अर्थसंकल्प तत्कालीन अर्थ सभापती. सी.डी. देशमुख यांनी सात लाख ५५ हजार रुपयांचा मांडला होता.च्त्यानंतर १९८४-८५ मध्ये प्रभाकर पाटील यांनी एक कोटी दोन लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर चित्रा पाटील यांनी २०१५-१६ मध्ये १०५ कोटींचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर चित्रा पाटील यांचे पती आस्वाद पाटील यांनी तब्बल १०६ कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प मांडला.

टॅग्स :Raigadरायगड