रायगडावर पर्यटकांना मिळणार शुद्ध पाणी

By admin | Published: March 25, 2017 01:32 AM2017-03-25T01:32:43+5:302017-03-25T01:32:43+5:30

रायगड जिल्हा पर्यटन विकास आराखड्यातून रायगड किल्ल्यावर एक कोटी १० लाख रुपयांची पाणीपुरवठ्याची कामे केली जाणार आहेत.

Raigad will get clean water for tourists | रायगडावर पर्यटकांना मिळणार शुद्ध पाणी

रायगडावर पर्यटकांना मिळणार शुद्ध पाणी

Next

आविष्कार देसाई / अलिबाग
रायगड जिल्हा पर्यटन विकास आराखड्यातून रायगड किल्ल्यावर एक कोटी १० लाख रुपयांची पाणीपुरवठ्याची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने फिल्टरेशन प्लॅन्ट बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना रायगड किल्ल्यावर येताना मिनरल वॉटरची बाटली घेऊन यावे लागणार नाही. पुरातत्त्व विभागाने विविध परवानग्यांबाबत सकारात्मकता दाखविल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी वर्षभरात लाखो पर्यटक येत असतात. धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन असे विविध पर्याय पर्यटकांना खुणावत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने गड- किल्ले पाहण्याची पर्यटकांची फारच उत्सुकता असते.
रायगड किल्ल्याच्या भ्रमंतीसाठी दिवसाला सुमारे दोन हजार पर्यटक येत असतात. त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सवासाठी लाखो शिवभक्त गडावर येतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे किल्ले जिंकले अथवा उभारले त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. सुमारे साडेतीनशे वर्षांनंतर आजही तेथील पाण्याचे तलाव, विहीर जिवंतपणे अस्तित्वात आहेत. रायगड जिल्हा परिषदेने सुमारे ३० वर्षांपूर्वी रायगडावरील पाण्याचे नियोजन केले होते. पाणीपुरवठ्यासाठी असणाऱ्या पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन आजघडीला खराब झाल्या आहेत. त्यांचे मजबुतीकरण करणे गरजेचे होते.
यासाठी रायगड जिल्हा पर्यटन विकास आराखड्यातून रायगड किल्ल्यावर एक कोटी १० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे.
मुंबईतून दिल्ली येथील पुरातत्व विभागाकडे फाईलचा प्रवास पूर्ण झाला आहे. त्याबाबतच्या आवश्यक त्या बैठकाही पार पडल्या आहेत. त्यामुळे रायगडावर पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा ठरणारा अडसर आता दूर झाला आहे.
पुरातत्त्व विभागाने विविध परवानग्यांना सकारात्मकता दाखविल्याने पाणीपुरवठा योजनेला बळ येणार असल्याचे चित्र दिसून
येते.

Web Title: Raigad will get clean water for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.