शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: बीपरजॉयच्या भीतीने उरण परिसरातील किनाऱ्यांवर अस्वस्थता : जेएनपीएही ॲलर्ट मोडवर!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 19:15 IST

Raigad: बीपरजॉय चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगड परिसराला धडकणार नसला तरी सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे  उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावातील नागरिक, मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- मधुकर ठाकूर उरण : बीपरजॉय चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगड परिसराला धडकणार नसला तरी सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे  उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावातील नागरिक, मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.खराब हवामान आणि समुद्रात मागील पाचसहा दिवसांपासून समुद्रात उसळलेल्या भयानक उंचीच्या लाटांमुळे सागरी मार्ग धोकादायक बनले आहेत.बिपरजॉयच्या संभाव्य भीतीने परिसरातील किनारपट्टीच भयग्रस्त, अस्वस्थ बनली आहे.

बीपरजॉय चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगड पासून शेकडो किलोमीटर अंतरावर आहे.गुजरातच्या दिशेने १३५-१४५ किमी इतक्या प्रचंड वेगाने धावणाऱ्या  बीपरजॉयमुळे गुजरातमधील विविध बंदरात अतिधोकादायकतेचा इशारा देणारा १० नंबरचा बावटा लावण्यात आला आहे.कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीपरजॉय चक्रीवादळाच्या तीव्रतेच्या झळा मुंबई, पालघर, रायगड परिसरात उमटू लागल्या आहेत.काही ठिकाणी किनारपट्टीवरील घरांची नासधूस झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.समुद्रात उसळत्या ५ मीटर उंचीच्या लाटांमुळे खबरदारी उपाययोजना म्हणून शुक्रवारपासून सलग पाच दिवसांपासून गेटवे -एलिफंटा, मोरा -भाऊचा धक्का, जेएनपीए -भाऊचा धक्का,रेवस-करंजा सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. एक जून पासून पावसाळी मासेमारी बंदीनंतर हजारो मासेमारी नौका उरण परिसरातील मोरा, करंजा, खोपटा, गव्हाण,वशेणी आदी विविध बंदरात याआधीच नांगर टाकून विसावा घेत आहेत. सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे  उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावातील नागरिक, मच्छीमारांना संभाव्य नुकसानीच्या भीतीचे ग्रासले आहे.

जेएनपीए बंदरही चक्रीवादळाचा व सातत्याने बदलत्या हवामानाचा अंदाज घेत आहे.  “जोरदार आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कंटेनर जहाजांच्या हालचालींवर मर्यादा येतील,” असे बंदर प्राधिकरणाने सांगितले.नांगरलेल्या सर्व जहाजांना त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. "कंटेनर जहाजे वगळता, हवामान विभागाचे धोक्याचा इशारा मिळेपर्यंत टग बोटींद्वारे पायलट बोर्डिंगसह इतर जहाजांच्या हालचाली सुरू राहतील."अशी माहिती जेएनपीएच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

टॅग्स :cycloneचक्रीवादळRaigadरायगड