शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: अवजड वाहतुकीमुळे धोकादायक बनलेल्या धुतूम अंडरपास रस्त्यावरच पुन्हा ट्रेलर पलटी, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 23:51 IST

Raigad News: धुतूम अंडरपास रस्त्यावरच रविवारी चार वाजताच्या सुमारास पुन्हा  ४० फुटी कंटेनर ट्रेलर् पलटी झाला आहे.यामुळे या गावाकडे येजा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली असल्याने ' रोज मरे त्याला कोण रडे ' अशीच अवस्था झाली असल्याने ग्रामस्थ मात्र संतप्त झाले आहेत.

- मधुकर ठाकूर उरण - धुतूम अंडरपास रस्त्यावरच रविवारी चार वाजताच्या सुमारास पुन्हा  ४० फुटी कंटेनर ट्रेलर् पलटी झाला आहे.यामुळे या गावाकडे येजा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली असल्याने ' रोज मरे त्याला कोण रडे ' अशीच अवस्था झाली असल्याने ग्रामस्थ मात्र संतप्त झाले आहेत.

धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या पळस्पा- जेएनपीए एनएच-४ बी दरम्यान नागरिकांच्या दळणवळणाची व्यवस्था म्हणून चार वर्षांपूर्वी अंडरपास आणि सर्व्हिस रोड तयार केला आहे. धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेला सर्व्हिसरोड आणि अंडरपास रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे.अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे  दुचाकी, चारचाकी आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्याशिवाय या अंडरपास आणि सर्व्हिस रोडवरुनदिवस रात्र मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू लागला आहे.अंडरपास रस्ता दररोज अपघातांनाही निमंत्रण देणारा ठरत असल्याने अपघाताची संख्या वाढतच चालली आहे.

या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.त्यामुळे अंडरपास आणि सर्व्हिस रोड धुतुम रहिवाशांसाठी धोकादायक ठरू लागले आहे.याबाबत उपाययोजना करण्यासाठी धुतुम ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अंडरपास रस्त्याच्या दोन्ही बाजूला हाईटगेट उभारण्याची मागणी केली आहे.मात्र त्याची पुर्तता अद्यापही झालेली नाही.

रविवारी (१७) संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास पुन्हा  ४० फुटी कंटेनर ट्रेलर् पलटी झाला आहे.यामुळे या गावाकडे येजा करणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद झाली असल्याने ' रोज मरे त्याला कोण रडे ' अशीच अवस्था झाली असल्याने ग्रामस्थ मात्र संतप्त झाले आहेत.दरम्यान अंडरपास रस्त्यावरच पटली झालेला ४० फुटी कंटेनर ट्रेलर् काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी  दिली.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड