शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्रकिनारी सापडली चरसची पाकिटे 

By राजेश भोस्तेकर | Updated: October 1, 2023 13:59 IST

Raigad News: रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) वरसोली समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अफगाण प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना आढळून आली.

- राजेश भोस्तेकर अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) वरसोली समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अफगाण प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना आढळून आली. यानंतर डॉ. भरत बास्टेवाड यांनी जागृतता दाखवित पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासोबत संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केल्यानंतर ही चरसची पाकिटे असल्याचे स्पष्ट केले.

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. स्वच्छता मोहिम सुरू असताना समुद्रकिनारी असणाऱ्या कचऱ्यात एका छोटी गोणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या नजरेस पडली. ही गोणी त्यांनी कचऱ्यातून बाहेर काढली असता, त्यामध्ये अफगान प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे दिसून आली. मागील काही दिवसांत रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारी अशी पाकिटे सापडली होती. त्यामध्ये चरस हा अमली पदार्थ असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. ही बाब लक्षात घेत डॉ. भरत बास्टेवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासोबत संपर्क साधत घटनेची माहिती दिली.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घटनास्थळी धाव घेत, सदर पाकिटे चरसची असल्याचे स्पष्ट करीत, तातडीने पंचनामा करून परिसरात शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशाच प्रकारच्या पिशव्या गेल्या महिन्यात रायगड किनाऱ्यावर सापडल्या असून, तब्बल साडेआठ कोटींचा चरस हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे अशी माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी पंचनामा करीत सदर पाकिटे जप्त केली आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थRaigadरायगड