अलिबाग - रायगड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सगळीकडे पाणी साचून रस्ते बंद झाले आहेत. अलिबाग, तळा, पोलादपूर, रोहा, महाड या तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने येथील शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सतत पडत असलेल्या पावसाने अलिबाग तालुक्यातील रामराज भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अंबा नदी ने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. बोर घर रस्त्यावर पाणी साचले असल्याने अलिबाग रोहा रस्ता बंद झाला आहे.
रायगड जिल्ह्याला गुरुवारी रेड अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. बुधवारी रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. अलिबाग शहरात ही ठिकठिकाणी पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील राम राज येथील नदीला पुर आला असल्याने बोरघर रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अलिबाग रोहा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.
जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने अलिबाग, तळा, पोलादपूर, रोहा, महाड या तालुक्यातील शाळा, कॉलेजना जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे. नागोठणे मधील अंबा नदिनेही धोक्याची पातळी ओलांडली असल्याने रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.