शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकरणात रायगडचा पोलिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 07:08 IST

भरती प्रक्रिया; गडचिरोली पोलिसांकडून सिद्धेश पाटीलला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत काही उमेदवारांनी खोटे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात रायगड पोलिस दलातील पोलिस शिपाई सिद्धेश पाटील याने हे बोगस दाखले दिले असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी अलिबागमधून सिद्धेश पाटीलला अटक केली. 

सिद्धेशने त्याच्या साथीदाराच्या सोबतीने किती जणांना दाखले दिले, याचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या २०२३ च्या पोलिस भरतीदरम्यान काही उमेदवार प्रकल्पग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र घेऊन भरतीसाठी आले होते, अशी माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे विभागाने तपास करून त्या भरतीच्या उमेदवाराविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

बोगस प्रमाणपत्र गुन्ह्याच्या तपासादरम्यान आतापर्यंत सात आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत सिद्धेश पाटील (नेमणूक : पोलिस मुख्यालय, प्रतिनियुक्ती- पैरवी अधिकारी, अलिबाग, सेशन कोर्ट) याने संबंधित भरतीच्या उमेदवारांना प्रकल्पाग्रस्तांचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गडचिरोली पोलिस दलाचे पथक शुक्रवारी अलिबाग येथे आले होते. सिद्धेश पाटील याने त्या उमेदवारांना त्याचा साथीदार देशमुख (रा. सांगली) याच्या मदतीने प्रकल्पातग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र बीड जिल्ह्यातून आणून दिल्याचे कबूल केले.

सात वर्षांपूर्वी झाला होता भरती

सिद्धेश पाटील हा अलिबाग तालुक्यातील असून, सात वर्षांपूर्वी रायगड पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्याने प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखला जोडला होता; मात्र मिळालेल्या माहितीनुसार पाटील हा प्रकल्पग्रस्त नसल्याचे कळते. त्याचा दाखलाही बोगस असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी