शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
5
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
6
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
7
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
8
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
10
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
11
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न
12
आयेशा खानने मारला मोदक अन् पुरणपोळीवर ताव, नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
13
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
14
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
15
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
17
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
18
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
19
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू

Raigad Landslide: रायगड जिल्ह्यावर आभाळ कोसळले; दरडींनी घेतला 60 जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 19:57 IST

Mahad Landslide, Poladpur Landslide: महाड-तळीये गावात दरड काेसळून 49 जणांचा मृत्यू, तर पाेलादपूर मध्ये 11 जणांना मृत्यूने कवटाळले. सकाळी सुरु झालेले बचाव कार्य सायंकाळी सहा वाजता थांबवण्यात आले आहे.

ठळक मुद्देनडीआरएफ, एसडीआरएफ, नाैदाल, काेस्टगार्ड यांची प्रत्येकी दाेन पथक तर स्थानिक पातळीवरील 12 बचाव पथकांचा रेस्क्यू आॅपरेशनमध्ये समावेश हाेता.तब्बल 22 तासांनी मदत मिळाल्याने दरेकरांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर.

आविष्कार देसाई लाेकमत न्यूज नेटवर्करायगड ः महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी काेसळलेल्या दरडीमध्ये (Mahad Landslide) 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाेलादपूर येथील पडलेल्या दरडीमध्ये 11 असा एकूण 60 जणांचा बळी गेला आहे. पाेलादपूर येथील किरकाेळ जखमींना महाड, पाेलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. (Landslide in Raigad district, 60 died.)

सकाळी सुरु झालेले बचाव कार्य सायंकाळी सहा वाजता थांबवण्यात आले आहे. बचाव पथक, पाेलिस यंत्रणा आणि डाॅक्टर्स यांनी बचाव कार्य संपले असल्याचे सांगितले आहे, ढिगऱ्या खाली काेणी अडकले आहे का याची खात्री पुन्हा एकदा करण्यासाठी शनिवारी बचाव कार्य हाती घेण्यात येणार अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.

तळीये हे गाव दरड प्रवण गावामध्ये नव्हते, जी गावे आहेत त्या गावातील नागरिकांना आधीच सर्तकतेच्या सुचना दिल्या हाेत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने रायगड जिल्ह्याला चांगलेच झाेडपले आहे. अतिवृष्टीने आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा महाड तालुक्याला बसला आहे. गुरुवारी महाड आणि पाेलादपूर तालुक्यात दरडी पडण्याच्या घटना घडल्या. महाड तालुक्यातील तळीये या गावात गुरुवारी सांयकाळी चार वाजण्याचा सुमारास दरड काेसळली हाेती. याची माहिती प्रशासना सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर बचाव कार्य हाती घेण्यात आले. परंतू पावसाचा जाेर, पुराचे पाणी, मार्गात दरडी पडल्याने घटनास्थळी पाेचण्यात अडचणी येत हाेत्या. पाचाड मार्गेही दरड काेसळली हाेती. त्यामुळे अडथळा निर्माण झाला हाेता.

रात्री हेलीकाॅप्टरच्या सहायाने घटनास्थळी बचाव पथकाला उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अतिवृष्टीमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर शु्क्रवारी सकाळी 11 वाजता मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत 38 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता 49 मृतदेह बाहेर काढण्यात आले हाेते. सायंकाळी सहा वाजता खात्री झाल्यावर बचाव कार्य थांबवण्यात आले.दरम्यान, पाेलादपूर येथील केवनाळे येथे चार घरांवर दरड काेसळली. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुतारवाडी येथेही दरड पडल्याने पाच असा एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दाेन्ही गावातील 13 जखमींना महाड  पाेलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • एनडीआरएफ, एसडीआरएफ, नाैदाल, काेस्टगार्ड यांची प्रत्येकी दाेन पथक तर स्थानिक पातळीवरील 12 बचाव पथकांचा रेस्क्यू आॅपरेशनमध्ये समावेश हाेता.
  •  
  • घटनास्थळी पालकमंत्री आदिती तटकरे, विराेधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपा नेते गिरीश महाजन, स्थानिक आमदार भरत गाेगावले यांनी भेट दिली.
  •  
  • तब्बल 22 तासांनी मदत मिळाल्याने दरेकरांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
  •  
  • गुरुवारी सायंकाळी दरड काेसळली आणि मदत शुक्रवारी सुरु करण्यात आली. या कालावधीत प्रशासन का पाेचले नाही असा सवाल दरेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी त्यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या समाेरच अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत नाराजी व्यक्त केली.
  •  
  • पुराचे पाणी आणि मार्गावर पडलेल्या दरडीमुळे घटनास्थळी पाेचण्यात उशिर झाला. पाचाड मार्गे जाण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे ही दरडी पडल्याने रस्ता बंद हाेता. असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितेल, मात्र प्रशासनाने ठरवले असते तर चालत सुध्दा येथे पाेचता आले असते. असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
  •  
  • जिल्हा प्रशासनाने बचावासाठी लागणारे साहित्य, अन्न पाकीटे, पाणी यांची व्यवस्था डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात केली आहे.
टॅग्स :landslidesभूस्खलनRaigadरायगडRainपाऊस