शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनंत गीते यांच्या ‘सिंहावलोकन’वर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 15:48 IST

प्रचार साहित्यावर नाव नसल्याने प्रकाशक-मुद्रकाविरुध्द गुन्हा दाखल, उमेदवार मात्र सहिसलामत

- जयंत धुळप

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात सेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याकडून प्रचाराकरीता वाटप करण्यात आलेल्या ‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेवर मुद्रक आणि किती प्रती छापल्या या बाबतचा अनिवार्य मजकूर छपाई करण्यात आला नसल्याने, झालेल्या निवडणूक आचार संहिता भंगते प्रकरणी अलिबाग शहर निवडणूक आचारसंहिता देखरेख प्रमुख व अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेष चौधरी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार या पुस्तिकेचे मुंबईतील मुद्रक व प्रकाशक यांच्या विरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 127 (क)अन्वये गुन्हा दाखलसेना-भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या या ‘सिंहावलोकन’ पुस्तिकेवर भारत निवडणूक आयोग आचारसंहिता नियम व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अन्वये अनिवार्य असणारा मजकूर छापला नसल्याने या पुस्तिकेचे प्रकाशक मुंबईतील मालाड पश्चिम येथील अनिरुद्ध गांधी आणि मुद्रक श्री इंटरप्रायझेस, गोरेगाव(पश्चिम) यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 127 (क)अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या पुस्तिकेचा वापर करणारे सेना-भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते हे सहिसलामत वाचले आहेत.

अलिबाग उपविभागीय अधिकारी यांनी उमेदवार गीते यांना बजावली नोटीसराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रतिनिधी अॅड. सचिन जोशी यांनी ‘सिंहावलोकन’ या पुस्तिकेवर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे नसल्यामुळे आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार रायगड निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केली होती. या बाबत अलिबाग उपविभागीय अधिकारी तथा अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी शिवसेना उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे या बाबत म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. 

सुनावणीअंती गुन्हा दाखल करण्याचे आदेशया बाबत सेना उमेदवार अनंत गीते त्यांचे वकील अॅड. एन. टी. रातवडकर यांनी, या ‘सिंहावलोकन’ पुस्तिकेच्या छपाईचे बिल व बिलाच्या प्रती सादर केल्या. ‘सिंहावलोकन’ पुस्तिका ही प्रचार साहित्य म्हणून सक्षम अधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता वितरीत झाली व त्यावर मुद्रक तसेच प्रकाशकाचे नाव नसल्याने ती छापून घेणारे प्रकाशक अनिरुद्ध गांधी, रा. मालाड पश्चिम आणि मुद्रक श्री इंटरप्रायझेस, 5०1, गोरेगाव पश्चिम यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 127(क) प्रमाणो पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश अलिबाग उपविभागीय अधिकारी तथा अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी दिले. त्यानुसार अलिबाग शहर निवडणूक आचारसंहिता देखरेख प्रमुख व अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेष चौधरी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार या पुस्तिकेचे मुंबईतील मुद्रक व प्रकाशक यांच्या विरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेraigad-pcरायगड