शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

रायगडमध्ये लालपरी पुन्हा धावली रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 12:39 AM

एसटी सुरू करताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून या ३६ बसेस सुरू करण्यात आल्या असून, रोज ३२४ फेऱ्या होणार आहेत.

 अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने २२ मार्चपासून संचारबंदी लागू केली होती. सार्वजनिक एसटी बस वाहतूकही बंद झाली होती. मात्र, आता राज्य परिवहन महामंडळाने दोन महिन्यांनंतर रेड आणि कंटेन्मेंट झोन वगळता जिल्हाअंतर्गत एसटी बस सेवा २२ मेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात शुक्रवारपासून लालपरी पुन्हा एकदा रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली.एसटी सुरू करताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून ही सेवा प्रवाशांना द्यायची आहे. रायगड जिल्ह्यातील आठ आगारांतून या ३६ बसेस सुरू करण्यात आल्या असून, रोज ३२४ फेऱ्या होणार आहेत. २२ मार्चपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली. कोरोना हा गर्दीच्या ठिकाणी वाढण्याची शक्यता असल्याने सर्व वाहतूक सेवाही बंद करण्यात आल्या. त्यामुळे एसटी बससेवाही बंद झाली होती. त्यामुळे कोट्यवधीचा आर्थिक फटका हा राज्य परिवहन महामंडळाला सहन करावा लागला आहे. मात्र, आता परिवहनमंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून एसटी रस्त्यावर धावताना दिसून येत आहेत. एसटी बस या निर्जंतुकीकरण करून प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ५० टक्के प्रवासी बसमध्ये घेतले जाणार आहेत. अलिबाग आगारातून प्रथम अलिबाग-पेण, अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-रोहा या एसटी बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच महत्त्वाचे असेल तरच प्रवाशांनी बसने प्रवास करा, असे आवाहनही अलिबाग आगारप्रमुख ए. व्ही. वनारसे यांनी केले आहे.प्रवाशांचाअल्प प्रतिसादअलिबाग : लॉकडाउनमुळे मिळालेल्या सक्तीच्या दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर एसटी रस्त्यावर धावली. मात्र, पहिल्याच दिवशी या लालपरीलाही प्रवाशांनी अल्प प्रतिसाद दिला.नियोजित फेऱ्यांपैकी केवळ ७० फेºयाच चालवण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.अलिबाग आगारातून सकाळी ८:४५ वाजण्याच्या सुमारास अलिबाग-पेण, मुरुड आगारातून मुरुड-अलिबाग, पेण आगारातून दुपारी पेण-पाली, अशा बसेस सोडण्यात आल्या.अटी-शर्तीवर एसटी सुरूसामाजिक अंतर राखून प्रवाशांनी एसटीमध्ये बसणे. ज्येष्ठ नागरिक तसेच १० वर्षांखालील मुलांना एसटी प्रवासाला बंदी करणे.बसमध्ये बसण्यापूर्वी मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणे, तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे, अशा अटी शर्तीवर एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगड