शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: मावळ लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजाराम पाटील निवडणूकीसाठी पुन्हा एकदा सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 22:17 IST

Maval Lok Sabha constituency: शेतकरी, कामगार, मच्छीमार, मराठा आणि बहुजन समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या संसदेच्या सभागृहात मांडण्यासाठी अपक्ष म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ नंतर १३ मे  २०२४ रोजी होणाऱ्या दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढविण्याची पक्की तयारी बहुजन समाजाचे नेते राजाराम पाटील सुरू केली आहे.

- मधुकर ठाकूरउरण - शेतकरी, कामगार, मच्छीमार, मराठा आणि बहुजन समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या संसदेच्या सभागृहात मांडण्यासाठी अपक्ष म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ नंतर १३ मे  २०२४ रोजी होणाऱ्या दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढविण्याची पक्की तयारी बहुजन समाजाचे नेते राजाराम पाटील सुरू केली आहे. बहुजन समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी २०१९ मध्ये  झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविली होती.

मावळ लोकसभेच्या या निवडणुकीत त्यांना ७५९०४ मते मिळाली होती.१३ मे २०२४ रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणूकीतही पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इरादा राजाराम पाटील यांनी पक्का केला आहे.महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे.लढविण्याचा निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही.निर्णय झाला तरी आपल्याला उमेदवारी मिळण्याची सुतरामही शक्यता नाही.मात्र यावेळी निवडणुक लढविण्यासाठी आपल्याला पुण्यातील लोकशाही पार्टी, कोकणातील बळीराज सेना या दोन पार्टीकडून आवताण आले आहे .

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमारांचे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.सिडको, नैना, अलिबाग -विरार कॉरिडॉर,नाणार आदी विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने शासनाकडून जबरदस्तीने संपादन करण्यात येत आहेत.कोस्टल झोनमध्ये उभारण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांत मच्छीमार समाज देशोधडीला लागला आहे.त्यांच्या पुनर्वसनाही प्रश्न प्रलंबित आहेत.प्रकल्पग्रस्त गावे आणि शेतकऱ्यांना गावठाण विस्ताराचा प्रश्नही लोंबकळत ठेवण्यात आला आहे.या सर्व सामाजिक मुद्यांवर  मराठा, बहुजन, ओबीसी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा मावळ लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती राजाराम पाटील यांनी दिली.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४maval-pcमावळ