शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नवी मुंबईसह रायगडला फटका; वीजपुरवठा खंडित झाल्याने कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:06 IST

रायगड जिल्ह्यात तीन तास बत्ती गुल; नागरिक हैराण

रायगड : महापारेषणच्या इतिहासामध्ये प्रथमच वीज पुरवठा खंडीत झाला. रायगड जिल्ह्यात सुमारे तीन तास वीज गायब झाली होती. २४० मेगावॉट वीजेच्या तुडवड्याने तब्बल तीन लाख ४५ हजार वीज ग्राहक प्रभावीत झाले होते.त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. मुंबई, ठाणे, नवीमुंबईमध्येही वीज पुरवठा खंडीत झाला होता.

विविध सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जनरेटच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरु राहील्याने या ठिकाणी विशेष अडचण आली नाही. मात्र, जिल्ह्यातील अन्य ग्राहकांना त्यांचा चांगलाच त्रास झाला. महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट-१ मध्ये देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. त्यामुळे त्याचा अतिरीक्त भार हा सर्किट -२ वर होता. मात्र सर्किट -२ मध्ये अचानक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याचे ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. अचानक वीज गायब झाल्याने सुरुवातीला काहीच कळले नाही. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील फोन खणखणत होते. वीज का गेली आहे याबाबतचा संदेश संबंधीत कंपनीने ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवल्यावर खरे कारण समजू शकले. त्यानंतर तब्बल तीन तासांनी वीज पुरवठा सुरु झाला.विजेच्या लपंडावामुळे नवी मुंबईकर हैराणदिवसभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नवी मुंबईकर ही हैराण झाले. अचानक वीज गेल्यामुळे रूग्णांचीही गैरसोय झाली. बेलापूर परिसरात पहाटे तीन ते सायंकाळपर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता.

सीबीडी, बेलापूर परिसरात पहाटे तीन वाजता विद्युत पुरवठा खंडीत झाला. नागरिक व लोकप्रतिनिधींनी वारंवार महावितरण कार्यालय व अधिकारी, कर्मचा-यांशी संपर्क केल्यानंतर ही व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती. पहाटे सात वाजता वीज आली. पुन्हा साडेदहा च्या दरम्यान ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला. अचानक वीज गेल्यामुळे रूग्णांचीही गैरसोय झाली. एक्स रे व इतर तपासण्या वेळेत करता आल्या नाहीत. घरीच उपचार सुरू असलेल्या कोरोना रूग्णांचे प्रचंड हाल झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. बेलापूर सेक्टर २० व इतर ठिकाणी दुपारी तीन वाजता पुन्हा वीज गेली. सायंकाळी साडेसातवाजता वीज आली. नागरिकांनी महावितरण शी संपर्क साधल्यावरही योग्य माहिती मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :electricityवीज