शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पनवेलमध्ये रायगड अन्न व औषध प्रशासनाचे छापे, दोन पान स्टॉल मधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखु साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 15:15 IST

रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी पनवेल येथे छापे घालून दिपा पान स्टॉल येथून  5 हजार रुपये किमतीचा तर विनम्र पान स्टॉल येथून 3 हजार 196 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखुचा साठा जप्त केला.

पनवेल -  रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी पनवेल येथे छापे घालून दिपा पान स्टॉल येथून  5 हजार रुपये किमतीचा तर विनम्र पान स्टॉल येथून 3 हजार 196 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखुचा साठा जप्त केला असून, हे पान स्टॉल पनवेल बस स्टॅण्डच्या जवळच असल्याने या ठिकाणी पुन्हा प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री होऊ  नये म्हणुन दोन्ही पान स्टॉल अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार सिल करण्यात आले असल्याची माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांनी दिली आहे.    पनवेल शहरात प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पेण अन्न व औषध प्रशासन कार्यालयास पनवेल शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडु यांच्योकडुन मिळाल्यावरून ठाणो येथील सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब समुद्रे, रमाकांत कुलकर्णी व राम भरकड यांनी केली आहे. रायगड जिल्हय़ात छुप्या पध्दतीने प्रतिबंधित अन्न पदार्थाची विक्री होत असलेल्या ठिकाणी रायगड अन्न व औषध प्रशासनाने स्थानिक नागरिक व पोलीस यांच्या मदतीने छापे व जप्तीची कारवाई करीत आहे.    गुटखा, पान मसाला, चघळण्याचा तंबाखू यांच्या रूपात आढळून आलेल्या तंबाखू, सुपारी व त्यात वापरण्यात येणारी अनेक अपमिश्रकांच्या घातक परिणमामुळे अॅक्युट हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, मुखाचा कर्करोग, अन्न नलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, जठर, आतडे, व श्वसन या संबंधिचे आजार होत असून गुटखा, पान मसाला, चघळण्याची तंबाखू यांचे व्यसन लागत असल्यामुळे खाणा:यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा हिताच्या दृष्टीने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2००6 अंतर्गत कलम 3० (2)(अ) नुसार अन्न सुरक्षा आयुक्तांनी गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट,सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट,सुगंधित सुपारी, अपमिश्रकेयुक्त उप्तादित चघळण्याची तंबाखू,मावा यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री यास दि. २० जूलै २०१७  पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.    रायगड जिल्हय़ात कोठेही छुप्या पध्दतीने प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, स्वादिष्ट-सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट-सुगंधित सुपारी, उत्पादित चघळण्याचा तंबाखू, खर्रा, मावा यांची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्री होत असल्यास  प्रशासनाचा टोल फ्रि क्रमांक 18००222365 अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०2143-252०85 वर संपर्क साधावा,असे आवाहन रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांनी केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा