शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

Raigad: खोल समुद्रात मासळीचा दुष्काळ, आवक घटल्याने भाव गगनाला, सुरमई, हलव्याने भाव दुप्पटीने वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 10:36 IST

Raigad: खोल समुद्रात  दुष्काळ जाणवत असल्याने  आवक घटल्याने मागील काही दिवसांपासून मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत.त्यामुळे खवय्यांनी आता मोर्चा स्थानिक बाजारात येणाऱ्या दुय्यम प्रतीच्या मासळी खरेदीकडे वळवला आहे.

- मधुकर ठाकूरउरण - खोल समुद्रात  दुष्काळ जाणवत असल्याने  आवक घटल्याने मागील काही दिवसांपासून मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत.त्यामुळे खवय्यांनी आता मोर्चा स्थानिक बाजारात येणाऱ्या दुय्यम प्रतीच्या मासळी खरेदीकडे वळवला आहे.खवय्यांच्या  पसंतीमुळे दुय्यम प्रतीच्या मासळीचेही भाव चांगलेच वधारले आहेत.

मुंबई, मुंबई उपनगर,ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सात जिल्ह्यात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.हवामान आणि निसर्गाच्या लहरीवरच चालणार्‍या या व्यवसायावर सुमारे १५ लाखाहुन अधिक कुटुंब उदरनिर्वाह चालवितात. विविध प्रकारातील मासेमारी व्यवसायातुन मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. निर्यातीच्या व्यवसायातुन देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते.मात्र देशाला प्रचंड परकीय चलन मिळवुन देणार्‍या मासेमारी व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.त्यामुळे निसर्गाच्या लहरीवर आधारित असलेला मासेमारी व्यवसाय याआधीच संकटात सापडला असतानाच आता मागील काही दिवसांपासून मच्छीमारांवर खोल समुद्रात मासळीच्या दुष्काळाचे सावट आले आहे.

त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारीसाठी एका ट्रिपवर होणारा सुमारे साडेतीन लाखांचा केलेला खर्चही वसुल होत नाही.मासळीच्या दुष्काळामुळे खर्चाची रक्कमही वसूल होत नसल्याने मच्छीमारांनी मच्छीमार नौका बंदरात नांगरुन ठेवणेच पसंत केले आहे.यामुळे मात्र बाजारात येणाऱ्या मासळीची आवक घटली आहे.आवक घटल्याने मागील काही दिवसांपासून मासळीचे भाव गगनाला भिडले असल्याची माहिती करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सभापती नितीन कोळी यांनी दिली.

खवय्यांचा ओढा दुय्यम प्रतीच्या मासळी खरेदीकडेआवक घटल्याने खवय्यांनी आता मोर्चा स्थानिक मच्छीमारांकडून बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मांदेली, बोंबील,निवठ्या,भिलजी,कोळीम, खुबे, कालवे, चिंबोरी, मुठे, किळशी,ढोमी,चिवणी, तळ्यातील गोडी मासळी आदी दुय्यम प्रतीच्या मासळीकडे वळवला आहे.यामुळे दुय्यम प्रतीच्या मासळीचेही भाव चांगलेच वधारले असल्याचे विक्रेत्या जयश्री कोळी यांनी सांगितले. 

सुरमई, हलव्याने भाव दुप्पटीने वाढलेसध्या घोळ ऐवजी सुरमई आणि हलव्याच्या भावात दुप्पटीने वाढ झाली असल्याचे महिला विक्रेत्या शीतल कोळी यांनी सांगितले.

याआधीचे दर                    आजचे दरघोळ -  ८०० ते ९०० की, ९०० ते ११०० किपापलेट ७०० ते ९०० कि.  १००० ते १२०० किसुरमई  ४५० ते ५००  कि. ८०० ते १००० किकोळंबी २५० ते ३५० कि  ४०० ते ५५०रिबनफिश १०० ते १२५ नगास १५० ते २००हलवा    ४५० ते ५०० कि,   ८०० ते १००० कि.माकुळ   २५०  ते ४५० नग  ६०० ते ८००रावस   ५०० ते ७०० कि.  ८०० ते १०००जिताडा. ८०० ते १००० कि. १००० ते   १२०० किबांगडा  ५ नगास ७५ ते १००  आज १०० ते १५० की.

टॅग्स :fishermanमच्छीमारRaigadरायगड