शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: चिरनेरमध्ये स्थानिक मच्छीमारांसाठी मच्छीमार सोसायटीची स्थापना: मान्यवरांच्या हस्ते अनावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 19:24 IST

Raigad News: चिरनेर खारपाटील- ठाकूर सहकारी मच्छीमार सोसायटीचा अनावरण सोहळा रविवारी  (२३)   स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. चिरनेरचे उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांच्या हस्ते या मच्छीमार सोसायटीचे अनावरण करण्यात आले.

- मधुकर ठाकूर उरण - चिरनेर खारपाटील- ठाकूर सहकारी मच्छीमार सोसायटीचा अनावरण सोहळा रविवारी  (२३)   स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. चिरनेरचे उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांच्या हस्ते या मच्छीमार सोसायटीचे अनावरण करण्यात आले.

चिरनेर खाडीक्षेत्रावर अनेक मच्छीमार पिढ्यानपिढ्या मच्छीमारी करीत आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवित आहेत.मात्र पारंपारिक मच्छीमारी व्यवसाय आता डबघाईला आला आहे . त्यामुळे येथील मच्छीमारांना अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या सहकारी मच्छीमार सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे.ही नोंदणीकृत मच्छीमार सोसायटी येथील स्थानिक मच्छीमार  कुटुंबियांसाठी  वरदान ठरणार असून या मच्छीमारी सोसायटीमुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगीकरण, हॉटेल व्यवसाय, रिसॉर्ट यामुळे मासळीची वाढती मागणी पाहता भविष्यात हा मच्छीमारीचा व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळेच या  सहकारी मच्छीमार सोसायटीची स्थापना केल्याचे अध्यक्ष प्रफुल्ल खारपाटील यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला.

याप्रसंगी राजिपचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर, शिवधन पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे, व्हाईस चेअरमन गजानन वशेणीकर, चिरनेरचे पोलीस पाटील संजय पाटील, ग्राहक संरक्षक मंचाचे अध्यक्ष शशांक ठाकूर, काँग्रेसचे उपाध्यक्ष घनश्याम पाटील,  इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत, चिरनेर ग्रा.प. सदस्य समाधान ठाकूर, ग्रा. प. सदस्या निकिता नारंगीकर, नीलम चौलकर,  जयश्री चिर्लेकर तसेच  अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :fishermanमच्छीमारRaigadरायगड