शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: लोकसभा निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, मतदानयंत्र हाताळणीचा अधिकाधिक सरावासाठी प्रयत्न

By निखिल म्हात्रे | Updated: April 17, 2024 11:21 IST

Raigad News: अलिबाग-मुरुड मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अलिबाग येथील मेघा चित्रमंदिरात प्रथम प्रशिक्षण सोमवार, मंगळवारी घेण्यात आले.

- निखिल म्हात्रेअलिबाग - अलिबाग-मुरुड मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अलिबाग येथील मेघा चित्रमंदिरात प्रथम प्रशिक्षण सोमवार, मंगळवारी घेण्यात आले. विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक आणि अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवस निवडणूक कामकाजाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मतदान कार्यपद्धती, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे हाताळावे, मतदान प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये, मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच वेळेचा अपव्यय होऊ नये, यासाठी यंत्र हाताळणीचा अधिकाधिक सराव व्हावा, यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रशिक्षण अलिबाग येथे मेघा चित्रमंदिरात घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीत सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कर्तव्य बजावून निवडणूक आयोगाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निवडणूक प्रशिक्षक तथा अपर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, मुरुड तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार अजित टोळकर उपस्थित होते.

मतदानापूर्वीचा मॉकपोल सकाळी साडेपाच वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत अशी ११ तास मतदानाची वेळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मतदान पोस्टल बॅलेट पेपरद्वारे करण्याचे आवाहन अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४raigad-pcरायगडEVM Machineएव्हीएम मशीनlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४