शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: मुसळधार पावसामुळे उरणमधील अनेक रस्ते पाण्याखाली,अनेक गावात, घरात पावसाचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 11:40 IST

Raigad Rain Update: मागील पाच सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेरला पुराच्या पाण्याने वेढले असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे.

- मधुकर ठाकूरउरण -  मागील पाच सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिरनेरला पुराच्या पाण्याने वेढले असुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचे पाणी गावातील अनेक नागरिकांच्या घरात शिरले आहे. उरण परिसरात मागील पाच -सहा दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे.कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विंधणे-दिघोडे,वशेणी-दिघाटी-केळवणे, नवघर फाटा- जेएनपीए वसाहत,केगाव-विनायक, कोप्रोली-खारपाडा, कंठवली - वेश्वी,जासई -गव्हाणफाटा  आदी रस्ते जलमय झाले आहेत. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

चिरनेर गावात पाणी शिरल्याने गावाला पुराचा वेढा पडला आहे.सुमारे ३५०-४०० घरात पुराचे पाणी शिरल्याने रहिवाशांना रात्र जागुन काढावी लागली आहे. उरण शहरातील कुंभारवाडा , इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, गणपती चौक, पालवी,आपला बाजार परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

तालुक्यातील नवघर,पागोटे, जेएनपीए कामगार वसाहत,करळ-सोनारी, जसखार,नागाव,म्हातवली, केगाव,भेंडखळ,मोठीजुई आदी अनेक गावात पावसाचे पाणी शिरले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे उरण परिसरातील अनेक कंटेनर यार्डही पाण्याखाली गेले आहेत. कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे जेएनपीए बंदराकडे ये-जा करणाऱ्या कंटेनर मालाच्या वाहतूकीवरही विपरीत परिणाम झाला आहे.कंटेनर मालाची वाहतूक मंदावली असल्याची माहिती उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भाटे यांनी दिली.

चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे मात्र उरण परिसरातील नागरिकांचे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. उरण परिसरातील शाळा महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.अनेक ठिकाणच्या गावातील मंगळवारी रात्रीपासून बत्ती गुल झाली आहे.बुधवारी सकाळपर्यंत तरी वीजेचा थांगपत्ता नाही.त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.

उरण तालुक्यात मंगळवारपासुन बुधवारी  सकाळपर्यंत अवघ्या २४ तासात १६५ मिमी  पावसाची नोंद झाली आहे. चिरनेर,जासई, जसखार,कंठवली,वैश्विक,विंधणे आदी गावातील अनेक घरात पावसाच्या पुराचे पाणी शिरले आहे. काही मार्गावरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोकादायक ठरू पाहाणारे रस्ते तुर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे पुरसदृश्य गावातील नागरिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे करण्यासाठी मंडळ अधिकारी,तलाठी, कोतवाल , ग्रामसेवक तैनात करण्यात आले आहेत.सद्यस्थितीत वित्तहानी वगळता कुठेही जीवितहानी झालेली नाही.पुरसदृश स्थीतीकडे प्रशासन  बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती उरण तहसीलदार उध्दव कदम  यांनी दिली.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड