शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

लाच प्रकरणांत रायगड जिल्हा आघाडीवर

By admin | Updated: November 28, 2015 01:16 IST

लाचलुचपत विभागाने रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे

बोर्ली-मांडला : लाचलुचपत विभागाने रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात लाचखोरीला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे, असे असले तरी उपलब्ध आकडेवारीवरून जिल्ह्यात लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे वर्षाला सरासरी दहाच्या आसपास उघडकीस येत असत. मात्र २०१४ ते नोव्हें. २०१५ पर्यंत ४९ लाचखोरीची प्रकरणे उघड झाली असून, यात ६८ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या दोन वर्षांत प्रत्येकी तीन व चार असे सात गुन्हे साबीत झाले आहेत. रायगड लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुरकर आणि त्यांच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्तादेखील उघडकीस आली आहे.एका बाजूला भ्रष्टाचाराने नडलेली सामान्य जनता आणि दुसऱ्या बाजूला ऐशोआरामात राहणारी नोकरशाही असे दिसत आहे. लाचलुचपत विभागाने भ्रष्ट नोकरशाहीवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीद्वारे होणाऱ्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याच्या प्रयत्नात असून, यास जनतेने सहकार्य करावे, असेही आवाहन वेळोवेळी लाचलुचपत विभागाकडून केले जात आहे.लोकप्रतिनिधीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेण्यास अनेक अडचणींबरोबर सामना करावा लागतो. मात्र जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती उत्तम कोळंबे आणि खालापूर पंचायत समिती सदस्य निवृत्ती खंडू पिंगळे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेत पोलीस कोठडीत ठेवण्याचे धाडस दाखविले होते. याचबरोबर जवळपास अकरा अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचारात महिलाही कमी नाहीत हे नगररचना विभागाच्या सहा. संचालक दिशा सांवत, सहकार विभागाच्या राखी गावडे दामत, तलाठी मनीषा हुलवले या सारख्या महिला अधिकारी - कर्मचारी यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी निगडीत महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यावर १४ कारवाई, तर जनतेचे ेसंरक्षण करणारा विभाग म्हणजे पोलीस विभागातील सात पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.