शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती प्रतिसाद निधी उभारणारा रायगड जिल्हा राज्यात पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 06:04 IST

रायगड जिल्ह्याला आपत्ती प्रसंगी मदत व बचावासाठी स्वत:चा निधी असावा, या जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडलेल्या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.

- जयंत धुळपअलिबाग -  रायगड जिल्ह्याला आपत्ती प्रसंगी मदत व बचावासाठी स्वत:चा निधी असावा, या जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडलेल्या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर)मधून तब्बल १५ लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात संकलित झाला आहे. परिणामी स्वत:चा आपत्ती प्रतिसाद निधी उभारणारा रायगड जिल्हा हा राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे.जिल्ह्यात पूर, दरड कोसळणे, तसेच समुद्रकिनारा लगत असल्याने चक्रिवादळ, त्सुनामी, सागरी उधाणे आदी नैसर्गिक आपत्ती व विविध मानवनिर्मित आपत्तींच्या घटनांचा धोका अनेकदा संभवत असतो.अशा वेळी जिल्ह्यातील आपत्ती प्रवणता विचारात घेऊन सक्षम प्रतिसाद आणि धोके सौम्यीकरणासाठी जिल्ह्यातील विविध उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी निर्माण करण्याचा निर्णय रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला. जिल्ह्यातील विविध उद्योग व प्रतिष्ठानांनी या महत्त्वपूर्ण निधीस आर्थिक साहाय्याचा प्रतिसादही देऊ केला आहे. ७ फेब्रुवारीला याद्वारे १५ लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे संकलित झाला आहे. गुरुवारी या निधीसाठी दीपक फर्टिलायझर्सशी संलग्न ईशान फाउंडेशन या संस्थेने पाच लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. तसेच एल.जी.पी.एल. लि. व गॅलॅक्सी प्रा.लि. तळोजा या उद्योगांनीदेखील प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, दीपक फर्टिलायझर्सचे उप महाव्यवस्थापक संतराम चलावाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक हे उपस्थित होते. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सह संचालक एम. आर. पाटील यांची हा निधी प्राप्त करण्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड