शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:14 IST

Raigad Crime news: दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

Raigad Murder News:रायगड जिल्ह्यातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची कोयत्याचे वार करुन निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुधागड तालुक्यातील परळी येथील डॉ. कल्पेश ओसवाल यांच्या राजेश पॉलीक्लिनिक अँड नर्सिंग होममध्ये मंगळवारी(13 मे) सांयकाळी हा प्रकार घडला. मयत तरुणी याच ठिकाणी नर्स म्हणून कामाला होती. 

प्राथमिक माहितीनुसार, पोर्णिमा अनंत देसाई, (रा. देसाईपाडा, ता. सुधागड) हिचे शेखर संतोष दुधाणे  (रा. दुधाणेवाडी, ता. सुधागड) याच्याशी प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे तरुणाने पौर्णिमाम हल्ला केल्याचे समजते. आरोपी शेअकरने कोयत्याने प्रेयसीच्या मानेपासून संपूर्ण अंगावर सपासप वार केले, यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने स्वतःही गळफास घेऊन आयुष्य संपवले.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले, तिथे त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणीचा अन् गळफास घेतलेला तरुणाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. ही हत्या प्रेमप्रकरणातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पाली पोलिस ठाण्याअंतर्गत घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरुन गेला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaigadरायगड