शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

Raigad: कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांची फसवणूक, जमिनींना कवडीमोलाचा भाव दिल्याचा आरोप

By निखिल म्हात्रे | Updated: February 22, 2024 15:13 IST

Raigad News: वसई विरार कॉरिडोरबाधित शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, लढेंगे जितेंगे अशा सरकारविरोधी गगनभेदी घोषणा देत अलिबाग शहर शेतकऱ्यांनी दणाणून सोडले.

- निखिल म्हात्रेअलिबाग - वसई विरार कॉरिडोरबाधित शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, लढेंगे जितेंगे अशा सरकारविरोधी गगनभेदी घोषणा देत अलिबाग शहर शेतकऱ्यांनी दणाणून सोडले.

या मोर्चात माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, खजिनदार महेश नाईक, सचिव रवींद्र कासूकर, सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, वसंत मोहिते, संतोष पवार, उपाध्यक्ष राजाराम जोशी, उपाध्यक्ष रमण कासकर, उपाध्यक्ष नामदेव मढवी, उद्योजक अरुण नाईक, चिरनेर अध्यक्ष ॲड. सुभाष कडू, सदस्य सिकंदर जोशी, विजय म्हात्रे तसेच विविध पदाधिकारी व हजारो शेतकरी उपस्थित होते.

अलिबाग एस टी डेपोतून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर त्याचे रूपांतर सभेत झाले. अलिबाग-वसई विरार कॉरिडोरबाधित शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी जमिनी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यावेळी त्यांनी उरणमधील जमिनींचा वाढता भाव पाहून भाव देण्याची मागणी केली होती, तसेच पुनर्वसन व शासनाच्या इतर सोयी-सवलतींची लेखी मागणी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी प्रांत दत्रात्रेय नवले यांच्यासोबत आठ वेळा बैठका घेतल्या व सदनशीर मार्गाने आपले म्हणणे मांडले. परंतु, शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या शासनाने मान्य केल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएलसारखे प्रकल्प उरणमध्ये आहेत. तर, तिसरी मुंबईदेखील येथेच होऊ पाहात आहे. हाकेच्या अंतरावर विमानतळ, तर अटल सेतुमुळे मुंबई 20 मिनिटांच्या अंतरावर आली आहे. इतकी महत्त्वपूर्ण असलेली येथील शेतकऱ्यांची जमीन विकासकामासाठी घेताना, या जमिनीचे मूल्य ठरविताना शासन शेतकऱ्यांचा पुढील भविष्याचा जराही विचार न करता, शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांना तोंडघशी पाडण्याचा डाव खेळत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, सरकारचा हा डाव शेतकरी उधळून लावतील, असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रकल्प राबवून शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य तो भाव शासन देत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कवडीमोल किमतीत येथील शेतकरी जमिनी देणारच नाही, असा निर्धारदेखील शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट प्रकल्प राबवून शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य तो भाव शासन देत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कवडीमोल किंमतीत येथील शेतकरी जमिनी देणारच नाही, असा निर्धारदेखील शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत दाद मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Raigadरायगड