शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रायगड : जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ४,००७ होळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:39 IST

होळी पौर्णिमेचा सण रायगड जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चार हजार सात होळ्या लागणार आहेत.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : होळी पौर्णिमेचा सण रायगड जिल्ह्यात गुरुवारी मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चार हजार सात होळ्या लागणार आहेत. शुक्रवारी लगेचच धुळवड साजरी होणार आहे. तत्पूर्वी कोळी समाजात होळीच्या आदल्या दिवशीच होलिकोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे कोळीवाड्यांमध्ये होळीची चांगलीच धूम सुरू होती.रायगड जिल्ह्यात होळी पौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरीकरणामुळे होळी सणानिमित्त होणारे कार्यक्र म दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. कोळी समाजाच्या वतीने होळी सणानिमित्त विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग समुद्रकिनारी धूलिवंदनाच्या दिवशी बैलगाडी शर्यतींचा थरार अनुभवायला मिळत होता. मात्र, न्यायालयाच्या बंदीमुळे गेल्या काही वर्षांपासून या बैलगाडी शर्यती बंद आहेत.जिल्ह्यात गुरु वारी सार्वजनिक दोन हजार ८८५ आणि खासगी एक हजार १२२ अशा एकूण चार हजार सात होळ्या लागणार आहेत. शुक्र वारी सर्वत्र धुळवड साजरी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. धुळवडीनिमित्त बाजारपेठा वेगवेगळे रंग, पिचकाºयांनी सजल्या आहेत. होळी पौर्णिमा, धूलिवंदन या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी येत असतात. या वेळेलाही त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. होलिकोत्सव आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस विभागाने वडखळ, कर्जत, माणगाव, महाड, श्रीवर्धन येथे पोलीस पथके तैनात केली आहेत.होळी सणाला आधुनिक तेची साथलोकमत न्यूज नेटवर्कवडखळ : रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वेळी विशेषत: नाच गाण्याचा कार्यक्र म असल्याने या वेळी डीजेचा वापर केला जात असून पारंपरिक वाद्याबरोबर डीजे आणि लेझर लाइट या आधुनिकतेची साथ होळी उत्सवाला मिळत आहे.रायगड जिल्ह्यात होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असून खारेपाटात सावरीच्या झाडाची होळी जंगलातून आणली जाते. ही होळी आणण्यासाठी गावातील तरु ण मंडळींसोबत ज्येष्ठ मंडळी सुद्धा जंगलात जातात. या वेळी जंगल सफर होत असून वन भोजनाचा कार्यक्र म आखला जातो. होळीच्या पाच दिवस अगोदर होळी नाचत गाजत गुलाल उधळत गावात आणली जाते. होळीच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून होळीची पूजा करतात व रात्री १२ वाजता होळीचा होम रचून होळी लावली जाते. या वेळी महिला होळीची पारंपरिक गाणी गातात, या वेळी होळीमध्ये नारळ टाकले जातात. तदनंतर या नारळाचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. होळी उत्सवात रंगपंचमीपर्यंत विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Holiहोळी