शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

रघुनाथ कदम यांची संघर्षाची भूमिका

By admin | Updated: April 11, 2017 01:50 IST

माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पर्यटनस्थळी राष्ट्रीय हरित लवादाकडून निर्माण झालेल्या प्रश्नी माथेरानकरांची भूमिका मांडणारे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ

कर्जत : माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या पर्यटनस्थळी राष्ट्रीय हरित लवादाकडून निर्माण झालेल्या प्रश्नी माथेरानकरांची भूमिका मांडणारे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ कदम यांना खुद्द लवादाने त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी माथेरानमधील वन विभागासंबंधी स्थानिकांकडून निर्माण झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी आपण शासनासोबत असल्याचे ठाम मत माजी नगरसेवक कदम यांनी मांडले.राष्ट्रीय हरित लवाद आणि माथेरानमध्ये वन जमिनीवर झालेली अतिक्र मणे याबाबत माहिती देण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि माथेरानमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ कदम यांनी नेरळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय हरित लवादकरीत असलेल्या कारवाईबाबत आपली मते मांडली. १३ फेब्रुवारी रोजी रघुनाथ कदम यांनी राष्ट्रीय हरित लवादाला पत्र लिहून माथेरानमध्ये होत असलेली कारवाई कशी चुकीची आहे याबाबत आपले मत प्रदर्शित केले होते. त्याचवेळी लवाद कोणत्या आधारावर कारवाई करीत आहे, याबद्दल त्यांनी खुलासा मागितला होता. त्या पत्रास लवादाने उत्तर देताना तुमचे म्हणणे आणि मागणी ही प्रतिज्ञापत्र सादर करून करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कदम यांनी माथेरान नगरपालिकेला पत्र लिहून मार्चअखेर पत्र हरित लवादाला देण्यासाठी आवश्यक असलेली माहिती देण्याची मागणी केली. त्या पत्रात कदम यांनी हरित लवादाने अनधिकृत ठरविलेल्या बांधकामाबद्दल निर्देश देणारी पत्रे, कपाडिया मार्केट हेरिटेज जाहीर केले आहे काय? असल्यास तेथे अतिक्र मणे झाली आहेत काय? २००३ मध्ये माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील झाले, असे असताना झालेली अतिक्र मणे, इंदिरा गांधी नगरमधील १५९ या सरकारी भूखंडावर झालेले अतिक्र मण, राष्ट्रीय हरित लवादाने कारवाई केलेल्या मालमत्तेची यादी आणि लवादापुढे पालिकेने सादर केलेले प्रतिज्ञापत्र यांची मागणी के लीअसे कदम यांनी स्पष्ट केले. माथेरानमधील २००३ नंतरची अतिक्र मणे कायम व्हावी म्हणून आपण लढत असून पालिकेने सत्ताधारी गटाला हाताशी धरून कदम हे सर्व अतिक्रमणे तोडण्यासाठी पुढाकार घेत असल्याबद्दल गैरसमज पसरविले आहेत. (वार्ताहर)निसर्ग पर्यटन पॉइंट संघटनेने कदम यांचा निषेध करणारे फलक देखील लावले आहेत. त्याबद्दल बोलताना त्यांनी आपण शासनाच्या वन जमिनीचे संरक्षण करावे यासाठी असलेल्या समितीवर आहोत आणि विविध प्रेक्षणीय स्थळांवर होत असलेली अतिक्र मणे याविरु द्ध आपण सतत आवाज उठवीत असतो. त्यामुळे वन जमिनीवर अतिक्र मण करून बांधलेल्या दुकानाचे खरे नाही असे मनोमन पटल्याने ते आपली बदनामी करीत आहेत. परंतु आपण सातत्याने वन जमिनीवरील अतिक्र मणाबाबत आवाज उठवीत असून त्यात कोणताही फरक पडणार नाही आणि माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळे आकर्षक व्हावी हा आपला हेतू कायम आहे. दुसरीकडे राष्ट्रीय हरित लवादाला प्रतिज्ञापत्र सादर करायचे असून पालिकेने माहिती लवकर दिल्यास ते लवकर शक्य होईल, आणि २००३ नंतरची बांधकामे कायम व्हावी, तोडली जाऊ नये यासाठी आपण सतत लढा देणार असल्याचे रघुनाथ कदम यांनी जाहीर सांगितले.- माथेरानमधील २००३ नंतरची अतिक्र मणे कायम व्हावी म्हणून आपण लढत असून पालिकेने सत्ताधारी गटाला हाताशी धरून कदम हे सर्व अतिक्र मणे तोडण्यासाठी पुढाकार घेत असल्याबद्दल गैरसमज पसरविले आहेत.