शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पेणच्या हमीभाव केंद्रावर तब्बल २३ हजार क्विंटल भाताची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 04:39 IST

बँक खात्यात पैसे जमा झाल्याने शेतकरी आनंदित

पेण : पेणमधील खरेदी-विक्री संघामार्फत पेण, वडखळ,वरसई या ठिकाणी हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्री केलेला सुमारे २३ हजार क्विंटल पेक्षाही जास्त प्रमाणात भात शासनाकडून खरेदी करण्यात आल्याचे खरेदी- विक्री संघाचे चेअरमन रघुनाथ तथा बापू दळवी यांनी सांगितले आहे.डिसेंबर महिन्यापासून पेण खरेदी- विक्री संघाने प्रथम वरसई, त्यानंतर पेण शहरात व वडखळ या ठिकाणी भात हमीभाव आधारभूत किमतीने शासनाच्या आदेशानुसार केंद्र सुरू केले होते. अवघ्या दोन महिन्यांत या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आजपर्यंत या तीन केंद्रातील खरेदी केलेल्या भाताची आवक २३ हजार क्विंटलपेक्षाही जास्त प्रमाणात झाली आहे. फेडरेशन अधिकारी यांनी यावर्षी खरेदी केलेल्या भाताचे चुकारे वेळेतच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे. यासाठी जिल्हा फेडरेशनच्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. नुकतीच वाशी विभागातील शेतकऱ्यांसाठी पेण-वाशी रस्त्यावर आधारभूत भात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले असून या विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आपला हात नेण्यासाठी सुलभ ठरणार आहे. खरीप हंगामात उत्पादन केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा भात शेवटपर्यंत हमीभाव आधारभूत केंद्रावर खरेदी करण्यात येणार असल्याचे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रघुनाथ तथा बापू दळवी यांनी सांगितले.भाताचे गोडाऊन पूर्ण क्षमतेने भरलेशेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शासनाने आधारभूत हमीभाव केंद्र सुरू केले आहेत. सध्या पेण शहरातील खरेदी- विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये खरेदी केलेल्या भाताने गोडाऊन पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोमवारपासून याची उचल करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच पेण, वडखळ येथील केंद्रावर शेतकरी बांधवांचा भात खरेदी केला जाईल, असे खरेदी विक्री संघाचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.