पेणच्या हमीभाव केंद्रावर तब्बल २३ हजार क्विंटल भाताची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 04:39 AM2021-02-08T04:39:30+5:302021-02-08T04:39:44+5:30

बँक खात्यात पैसे जमा झाल्याने शेतकरी आनंदित

Purchase of 23,000 quintals of paddy at Pen guarantee center | पेणच्या हमीभाव केंद्रावर तब्बल २३ हजार क्विंटल भाताची खरेदी

पेणच्या हमीभाव केंद्रावर तब्बल २३ हजार क्विंटल भाताची खरेदी

Next

पेण : पेणमधील खरेदी-विक्री संघामार्फत पेण, वडखळ,वरसई या ठिकाणी हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्री केलेला सुमारे २३ हजार क्विंटल पेक्षाही जास्त प्रमाणात भात शासनाकडून खरेदी करण्यात आल्याचे खरेदी- विक्री संघाचे चेअरमन रघुनाथ तथा बापू दळवी यांनी सांगितले आहे.

डिसेंबर महिन्यापासून पेण खरेदी- विक्री संघाने प्रथम वरसई, त्यानंतर पेण शहरात व वडखळ या ठिकाणी भात हमीभाव आधारभूत किमतीने शासनाच्या आदेशानुसार केंद्र सुरू केले होते. अवघ्या दोन महिन्यांत या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आजपर्यंत या तीन केंद्रातील खरेदी केलेल्या भाताची आवक २३ हजार क्विंटलपेक्षाही जास्त प्रमाणात झाली आहे. फेडरेशन अधिकारी यांनी यावर्षी खरेदी केलेल्या भाताचे चुकारे वेळेतच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे. यासाठी जिल्हा फेडरेशनच्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. नुकतीच वाशी विभागातील शेतकऱ्यांसाठी पेण-वाशी रस्त्यावर आधारभूत भात हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले असून या विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आपला हात नेण्यासाठी सुलभ ठरणार आहे. खरीप हंगामात उत्पादन केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा भात शेवटपर्यंत हमीभाव आधारभूत केंद्रावर खरेदी करण्यात येणार असल्याचे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रघुनाथ तथा बापू दळवी यांनी सांगितले.

भाताचे गोडाऊन पूर्ण क्षमतेने भरले
शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून शासनाने आधारभूत हमीभाव केंद्र सुरू केले आहेत. सध्या पेण शहरातील खरेदी- विक्री संघाच्या गोडाऊनमध्ये खरेदी केलेल्या भाताने गोडाऊन पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोमवारपासून याची उचल करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच पेण, वडखळ येथील केंद्रावर शेतकरी बांधवांचा भात खरेदी केला जाईल, असे खरेदी विक्री संघाचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

Web Title: Purchase of 23,000 quintals of paddy at Pen guarantee center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.