शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता चौकशी प्रकरण: राजन साळवींसह भाऊ, पुतण्या चौकशीला हजर

By राजेश भोस्तेकर | Updated: January 10, 2024 13:01 IST

वहिनी अनुराधा दीपक साळवी या आजारपणामुळे गैरहजर राहिल्या होत्या.

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : कोकणातले ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या भाऊ, वहिनी आणि पुतण्या याना बुधवारी २७ डिसेंबर रोजी रायगड लाच लुचपत विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. लाच लुचपत कार्यालयात हजर राहण्यासाठी साळवी कुटुंबीयांनी १० जानेवारी २०२४ पर्यंत वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार बुधवार १० जानेवारी रोजी आमदार राजन साळवी, भाऊ दीपक साळवी,  पुतण्या दुर्गेश दीपक साळवी हे अलिबाग लाच लुचपत कार्यालयात चौकशीला हजर झाले आहेत. वहिनी अनुराधा दीपक साळवी या आजारपणामुळे गैरहजर राहिल्या होत्या.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या मालमत्ते बाबत गेली वर्षभर रायगड लाच लुचपत विभागातर्फे चौकशी सुरू आहे. बुधवार २७ डिसेंबर रोजी साळवी यांचा भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस रायगड लाच लुचपत विभागाने दिली होती. आमदार साळवी यांच्या जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारी बाबत चौकशीला बोलवण्यात आले होते. 

साळवी कुटुंबाने लाच लुचपत विभागाकडे चौकशीला येण्याची मुदत मागितली होती. त्यानुसार ९ जानेवारी पर्यंत लाच लुचपत विभागाने मुदत दिली होती. १० जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजता आमदार राजन साळवी हे आपला भाऊ आणि पुतण्या यांच्यासह कार्यालयात दाखल झाले. लाच लुचपत विभागाकडून त्याच्या कुटुंबाची चौकशी सुरू झाली आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागRajan Salviराजन साळवीShiv Senaशिवसेनाalibaugअलिबाग