शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग तालुक्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

By निखिल म्हात्रे | Updated: October 8, 2023 13:12 IST

एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. त्यासाठी एक गट प्रवर्तक, गट मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षकाची निवड न केली जाईल.

अलिबाग - कृषि विभागमार्फत अलिबाग तालुक्यात डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजने अंतर्ग अलिबाग तालुक्यासाठी ५०० हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य देण्यात आले आहे. शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त वापर, त्यामुळे खालावलेला जमिनीचा पोत तसेच, रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीचे मानवी आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम याला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेची सुरुवात कृषि विभागमार्फत अलिबाग तालुक्यात करण्यात आली आहे. 

या योजनेचा कालावधी ३ वर्षांचा असणार आहे. ही योजना १०० टक्के अनुदानावर राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र सेंद्रिय शेतीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या योजनांतून शेतकऱ्यांना मदत करणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, मोठ्या क्षेत्राचे प्रमाणीकरण व कृषी विकास योजनेतून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतीमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रसायन अवशेषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होईल.

सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, तिचा इतरत्र प्रसार करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी योजनेची उद्दिष्टे आहेत. या योजनेत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीची देखील नोंदणी करण्यात येणार आहे. एक किंवा सलग क्षेत्र असलेल्या गावात किमान १० हेक्टर ते ५० हेक्टर क्षेत्राचा एक गट तयार करावा लागेल. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. त्यासाठी एक गट प्रवर्तक, गट मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षकाची निवड न केली जाईल.डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीमिशन योजने अंतर्गत लागवड ते काढणी, ब्रेडिंग व मार्केटिंग, प्रमाणीकरणापर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, आदिवासी शेतकरी, शेतकरी गट यांनी या योजनेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे. - प्रदीप बैनाडे, तालुका कृषि अधिकारी, अलिबाग.

टॅग्स :Farmerशेतकरीalibaugअलिबाग