शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ‘दाखल्यां’ची प्रतीक्षा,आरसीएफ प्रकल्पातील रेल्वे मार्गासाठी दिली जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 05:17 IST

आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता अलिबाग तालुक्यातील चरी गावामधील जमीन संपादित करण्यात आली. मात्र बाधित शेतक-यांना पुनर्वसन अधिनियन १९९९ नुसार ‘प्रकल्पबाधित’ वा ‘प्रकल्पग्रस्त’ असे दाखले, तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे नोकरी दिली गेली नाही.

 - जयंत धुळपअलिबाग : आरसीएफ थळ रेल्वेलाइनकरिता अलिबाग तालुक्यातील चरी गावामधील जमीन संपादित करण्यात आली. मात्र बाधित शेतक-यांना पुनर्वसन अधिनियन १९९९ नुसार ‘प्रकल्पबाधित’ वा ‘प्रकल्पग्रस्त’ असे दाखले, तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे नोकरी दिली गेली नाही. वर्षानुवर्षे आश्वासनपूर्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकºयांना १९८२ पासून झालेली आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, या मागणीकरिता चरी गावातील आरसीएफ थळ रेल्वेलाइन बाधित हिराजी दामोदर थळे, नागू रामजी ठाकूर, इंदुबाई दत्तात्रेय थळे,अरविंद कृष्णाजी ठाकूर आदी २९ शेतकºयांनी आपला अर्ज अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनावणे यांच्याकडे दाखल केले आहेत.आरसीएफ थळ रेल्वेलाइनमधील बाधित शेतकºयाचे नाव, वय, जमीन सर्व्हे नंबर, ज्याच्या नावे प्रकल्पबाधित वा प्रकल्पग्रस्ततेचा दाखला पाहिजे त्याचे नाव, गाव, जन्मतारीख व शिक्षण असा सर्व तपशील या अर्जात नमूद करण्यात आला आहे.अर्जात माझी व माझ्या कुटुंबीयांची जमीन आरसीएफ रेल्वे लाइनकरिता संपादित झाली असून त्यास महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम १९९९ लागू करणे कायद्यास अभिप्रेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जमीन संपादनाच्या वेळी आरसीएफ थळ कंपनीत नोकरी मिळेल, असे आश्वासन भूमी संपादन अधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार कुटुंबातील सक्षम व्यक्तीस नोकरी मिळेल असे गृहीत होते. परंतु नोकरी दिली नसल्याने १९८२ ते २०१८ अशा गेल्या ३६ वर्षांचे दरमहा किमान १० हजार रुपये याप्रमाणे ४ कोटी ३२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले असून शासनाने घोर फसवणूक केल्याचे अर्जदारांनी नमूद केले आहे.शासनाकडून झालेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी एकूण तीन मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, नोकरी न दिल्याने झालेले आर्थिक नुकसान आम्हास आरसीएफ कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून द्यावे, अशी पहिली मागणी आहे. बाधित शेतकºयांच्या सक्षम वारसास वा प्रतिनिधीस प्रकल्पग्रस्ततेचा दाखला मिळणे अपेक्षित आहे. या दाखल्याच्या आधारे वारसास शासनाच्या नोकरभरतीमध्ये आरक्षण मिळू शकते. तरी संबंधित अर्ज स्वीकारून कार्यवाही करावी. संपादन प्रक्रियेचा भाग म्हणून पुनर्वसन कायद्याच्या कलमान्वये कार्यवाही करावी तसेच प्रकल्पग्रस्ततेचा दाखला मिळावा, अशी दुसरी मागणी आहे. अर्जदार शेतकरी श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य असून अर्जाबाबत योग्य निर्णय घेताना शासकीय बैठकांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या गाव समितीशीही विचारविनिमय करावे, असे अर्जात अखेरीस नमूद करण्यात आले आहे.थळ येथील आरसीएफच्या रेल्वेमार्गासाठी ३६ वर्षांपूर्वी भूमिसंपादन झाले आहे. आता त्यास बराच काळ लोटला आहे. प्रकल्पग्रस्तांना दाखले देणे हे पुनर्वसन विभागाचे काम आहे. तरी सुद्धा या प्रकरणी उपविभागीय महसूल कार्यालयातील नोंदी तपासून पाहिल्या जातील.- सर्जेराव सोनावणे, अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी.आरसीएफ थळ कंपनीत नोकरीचे भूमी संपादन अधिकाºयांचे आश्वासन फोलआरसीएफच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आर्थिक नुकसानभरपाई मिळावी

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगडnewsबातम्या